G Ad

नवीन हॉटेल खाद्यगृह परवाना


हॉटेल व्यवसाय हा चांगला उत्पन्न देणारा व्यवसाय आहे.ग्रामीण व शहरी भागातील तरुणांना स्वयंरोजगार उपलब्धतेच्या दृष्टीने हॉटेल व्यवसायाचा वाट मोठा आहे.हॉटेल किंवा खाद्यगृह सुरु करणे सोपे असते.परंतु त्याची प्रत्यक्ष रीतसर कायद्याने नोंदणी करणेही महत्वाचे व बंधनकारक आहे.त्यासाठी पुढील कागदपत्रांची पूर्तता करून आपला व्यवसाय अधिकृत करता येईल.

  • विहित नमुन्यातील अर्ज कोर्ट फी स्टॅम्प सह.
  • शॉप कायद्या प्रमाणे सहा कामगार आयुक्त यांच्या कडील नोंदणी दाखला
  • अन्न व भेसळ खात्याकडील अनुज्ञप्ती नोंद्मी दाखला.
  • स्वतची जागा असल्यास मालकी हक्काचे प्रमाणपत्र.
  • जागा स्वताची नसल्यास संबंधित जागा मालकाचे समंती पत्र ,पी.आर.कार्ड.व जागा मालकाच्या नावे एन.ए.बेबाकी प्रमाणपत्र,कर भरणा पावती.
  • पालिका / महानगरपालिका याचे न हरकत प्रमाणपत्र.
  • पोलीस स्टेशनच्या न हरकत दाखला.
  • आरोग्य अधिकारीयांचे प्रमाणपत्र.
  • प्रस्तावित हॉटेल किंवा खाद्यगृह हे शेतजमिन असल्यास वाणिज्य कारणासाठी अकृषिक परवानगीची प्रत.

No comments

Web Analytics