G Ad

नदी जवळील प्लॉट व पूररेषा



अनेक व्यक्तीचे प्लॉट हे नदीच्या भाग लगत असतात. अशा वेळी त्यांना बांधकाम परवानगी देते वेळी पूररेषेचा विचार करावा लागतो. त्यासंबंधी असणारे नियम पाहून परवानगी दिली जाते.

पूररेषा दोन प्रकारच्या आहेत.

. निळी-निषिद्धक पूररेषा :-

जे क्षेत्र कोणत्याही वषी पूर येण्याच्या शक्यतेमुळे बांधकामाच्या दृष्टिकोनातून ते निषेध ठरवितात- सरासरीने २५ वर्षातून एकदा या वारंवारितेने येणारा पूर विसर्ग वाहून नेण्यास जे नदीचे पात्र लगतचे क्षेत्र आवश्यक ते क्षेत्र म्हणजे निषिध्दक्षेत्र निळी पूररेषा यामधील भूखंडात बांधकाम करता येत नाही. परंतु नदी हद्द ते निळी पूररेषा यामधील क्षेत्र निषिद्ध क्षेत्र असून अशा क्षेत्राचा उपयोग फक्त मोकळ्या जमिनीच्या स्वरूपाने उदा. उदयाने, खेळाची मैदाने, किंवा हलकी पिके घेणे अशा कारणांसाठीच केला जावा असे महाराष्ट्र शासन पाटबंधारे विभागाचे सन १९५९ च्या परिपत्रकात नमूद आहे.

. लाल-नियंत्रक पूररेषा :-


पर्जन्यमानाच्या दृष्टीने कोणत्याही वषी साधारण १०० वर्षातून एकदा ज्या ठिकाणापर्यंत पूर येवू शकतो तो तलांकदर्शक लाल पूररेषा या मधील भूखंडात बांधकाम करता येते. तथापी नियंत्रित क्षेत्रामध्ये बांधकामाच्या तळमजल्याच्या जोत्याची पातळी हि लाल पूररेषा आणि नजीकचा पोहच रस्ता यांची पातळी यामधील जी पातळी वर असेल त्यापेक्षा .५० मी. वर ठेवून बांदकाम करता येते.                        

No comments

Web Analytics