G Ad

महार इनाम वर्ग ६ ब जमीन विक्रीस परवानगी



महार इनाम वर्ग जमीन विक्रीस परवानगी देणे स्वरूप :-

. तहसीलदार यांचा जमीन विक्री करणारा खरेदी करणारा यांचे जबाबीसह विक्री पर्वांगीकामी शिफारस असलेबाबत अहवाल

. /१२ वरील सर्व साधारक अथवा त्यांचे जनरल मुखत्यार यांचा विक्री परवानगी कामी अर्ज आवश्यक असतो. जनरल मुख्यरपत्रकासह

. अर्जदार यांचे नावे असलेली जमीन मुलाची महार इनाम वर्ग ची असणे आवश्यक आहे

. मुंबई गावाची कनिष्ठ वतने नाहीशी करणेबाबत अधिनियम १९५८ मधील तरतुदीनुसार जमीन खालसा झालेली असावी.

. जमीन खालसा झालेनंतर कब्जा हक्क रक्कम सरकार जमा करून रिग्रेट झालेली किंवा करून घेणे आवश्यक असतो.

. जमीन रिग्रेट वेळी असलेले मूळ धारक /१२ वरील आजचे धारक यांचे अनुषंगाने जमीन सर्व वारसांचे नावे कमी झालेली असणे आवश्यक आहे.

. जमीनीची यापूर्वीची हस्तांतरणे सक्षम अधिकारी यांचे परवानगी शिवाय झालेली नसावीत.

. विक्री करावयाचे क्षेत्र मुंबईचा जमिनीचे तुकडे पाडनेस प्रतिबंध करणे आणि त्यांचे एकत्रीकरण करणे याबाबत अधिनियम १९४७ अन्वये किमान प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी नसावे. म्हणजेच ते बागायत क्षेत्राकरिता .२० हे आर जिरायत क्षेत्राकरिता .४० हे आर पेक्षा कमी नसावे.

. जमीन विक्री करणारे व्यक्तीचे सामुदायिक / संयुक्त खाते असलेस गाव नमुना - वरील संमती असणे आवश्यक आहे.

१०. जमीन विक्री करणार व्यक्तीचे वारसांचे संमतीपत्र आवश्यक आहे.

११. एकत्रीकरण योजनेचा उतारा तपासणे

१२. जमीन विक्री करणार यांचे आवश्यक कागदपत्र यामध्ये विहित केलेप्रमाणे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे.

१३. जमीन खरेदी करणार यांचे आवश्यक कागदपत्र यामध्ये विहित प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे.

१४. चालू बाजारमूल्यदर तक्त्यानुसार संबंधित दुय्यम निबंधक यांचेकडील मूल्यांकन आणि तहसीलदार यांचेकडील विहित सूचीतील मूल्यांकन आणि तहसीलदार यांचेकडील विहित सूचीतील मूल्यांकन यापैकी जास्त असलेल्या मूल्यांकनाचे आधारे नजराणा रक्कम आकारणे आवश्यक आहे.

१५. जमीन खरेदी करणार व्यक्ती शेतकरी किंवा शेतमजूर आहे का हे पहिले जाते.

१६. खरेदीदार मागासवर्गीय नसलेस विक्री करावयाचे जमिनीचे कि. मी. परिसरात मागासवर्गीय व्यक्ती जमीन खरेदी करणेस तयार आहे का या बाबत प्रसिद्ध केलेल्या नोटीस नुसार तहसीलदार यांचा अहवाल पहिला जातो.

. आवश्यक कागदपत्रे :-

. अर्जदाराचा अर्ज

. जमिनीचे सन १९४० पासूनचे गट / सर्व्हे नंबरचे /१२ त्यावरील फेरफार प्रमाणित प्रत

. एकत्रीकरणाचा उतारा - उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाचा

. अर्जदार यांचे वारसांचे जमीन विक्री संमतीपत्र

. खाते उतारा - प्रमाणे साधारकांचे संमतीपत्र

. जमीन विक्री करणार यांचे प्रतिज्ञापत्र

. विक्री करावयाच्या जमिनीबाबत दावा न्यायप्रविष्ट नाही प्रतिज्ञापत्र

. जमीन विक्री केल्यांनतर भूमिहीन होत नाही प्रतिज्ञापत्र

. भूमिहीन होत असल्यास पुन्हा शासनाकडे जमीन मागणी करणार नाही या बाबतचे प्रतिज्ञापत्र

१०. मालकी हक्क अर्जदाराचा आहे त्याबाबत भविष्यात काही वाद उद्भवल्यास सर्वस्वी जबाबदारी अर्जदार याची राहील प्रतिज्ञापत्र.

११. शासनाने विहित केलेली नजराणा रक्कम भरणेस तयार आहे

१२. भूसंपादन, पुर्नवसन प्रस्ताव सुरु नाही बाबतचे प्रतिदनपत्र

१३. जमीन खरेदी करणार यांचे जमीन खरेदी नंतर कमाल मर्यादेपेक्षा अधिक जमीन धारण करणार नाही असे प्रतिदनपत्र

१४. जमीन आहे त्या शर्तीवर घेणेस तयार असल्याचे प्रतिज्ञापत्र

१५ जमीन विक्री करणार यांचे मालकी हक्काची खात्री केलेली असून त्याबाबत भविष्यात वाद उद्भवलेल्यास जबाबदारी खरेदी करणार यांची राहील असे प्रतिज्ञापत्र .

१६. जमीन खरेदी करणार हे शेतकरी असलेबाबत /१२ उतार किंवा शेतमजूर असलेबाबत संबंधित तहसीलदार यांचा दाखला

१७. जमिनीचे संबंधित दुय्यम निबंधक यांचे कडील चालू बाजारमूल्यदर तक्त्यानुसार मूल्यांकन

१८. छाननी अंती आवश्यक अन्य कागदपत्रे

. निर्णय घेणारे अधिकारी :-

महार इनाम वर्ग जमीन विक्रीस परवानगी देणे निर्णय अपर जिल्हा अधिकारी आहेत.

. शासन निर्णय :-

. मुंबई गावाची कनिष्ठ वतने नाहीशी करणेबाबत अधिनियम १९५८कलम .

. महाराष्ट्र जमीन महसूल परिपत्रक क्र. डटीएम / १०८३ / सी आर / ८८६/ - दि. १६//१९८३

. महाराष्ट्र जमीन महसूल वनविभाग परिपत्रक क्र. बीआयडब / १०८३ / सी आर / ५९३/ - दि. ०४/०२/१९८३

. महाराष्ट्र जमीन महसूल वनविभाग यांचे कडील अधिसूचना दि. २५ सप्टेंनबर २००१



2 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. Bhill jagle inam varg 6 b ye Jamin bechneke liye kis ki pravngi lagti hai

    ReplyDelete

Web Analytics