G Ad

प्रॉपर्टीचे आवश्यक कागदपत्रे



फ्लॅटचा ताबा घेण्याच्या वेळेस फ्लॅटसंबंधी बिल्डरशी केलेला करार (अॅग्रीमेण्ट) फ्लॅटधारकाकडे असते. परंतू सोसायटी होऊन जो पर्यंत सोसायटीकडून भागपत्र (शेअर सटिर्फिकेट) त्याला मिळत नाही तोपर्यंत तो खऱ्या अर्थाने मालक नसतो. म्हणून बिल्डरबरोबरचे अॅग्रीमेंट आणि ते रजिस्टर्ड झाल्याची पावती, बिल्डींग पूर्ण झाल्याचा दाखला, सोसायटीच्या रजिस्ट्रेशनची प्रत आणि शेअर सटिर्फिकेट . कागदपत्रे सभासदाने काळजीपूर्वक सांभाळावी.

कागदपत्रे प्राप्तीचे ठिकाण

. खरेदीखत :- रजिस्टर्ड खरेदीखत खरेदीच्या दिवशीच मा. सहाय्य्क दुय्यम निबंधक यांचे कार्यालयामधून मिळते.

. खरेदीखत पावती :- दुय्यम निबंधक यांचे कार्यालयामधून

. इंडेक्स सूची क्र. :- दुय्यम निबंधक यांचे कार्यालयामधून

. /१२ उतारा :- मा. गाव कामगार तलाठी यांचे कार्यालयामध्ये /१२ मिळतो.

. स्वतंत्र प्लॉटची मोजणी :- तालुका निरीक्षक भूमिअभिलेख यांचेकडे अर्ज करून मिळवता येतो.

. मान्य ले-आऊट नकाशा :- नगर रचना कार्यालय महानगरपालिका

. स्वतंत्र प्लॉट मोजणी :- तालुका निरीक्षक भूमिअभिलेख यांचेकडे अर्ज करून मिळवता येतो.

. अकृषिक परवानगी :- मा. जिल्हाधिकारी यांचे कार्यालय महसूल विभाग.

. जागेचा अकृषिक शेतसारा भरणे :- मा. गावकाम तलाठी यांचेकडे किंवा तहसीलदार यांचेकडे ऑफिसमध्ये भरणा करता येतो.

१०. जागेचा झोन दाखला :- नगर रचना विभाग, नगरपालिका, महानगरपालिका यांचे विकास योजना कार्यालयामधून अर्ज केल्यानंतर मिळवता येतो.

११. U.L.C. दाखला किंवा ऑर्डर :- कमाल जमीन धारणा कायदा मा. अप्पर जिल्हाधिकारी यांचे कार्यालयामधून                        

No comments

Web Analytics