G Ad

जमीन_खरेदी_करताना


कृपया अत्यंत महत्वाची माहिती प्रत्येकाने तुमच्या #Profile वरती #Share करावे ✔✔
1.
जमीन खरेदी करताना घ्यावयाची काळजी (y)
2.
जमिनीचा सातबारा आपल्या नावे केव्हा होतो (y)
3.
व्यावहारिक जगात लागणारे काही महत्वाची जमिनीची क्षेत्रफळाची रुपांतरे (y)
====================================================
1. 
#जमीन_खरेदी_करताना ✔✔✔✔https://www.facebook.com/images/emoji.php/v6/ffc/1/16/1f44d.png👍https://www.facebook.com/images/emoji.php/v6/ffc/1/16/1f44d.png👍https://www.facebook.com/images/emoji.php/v6/ffc/1/16/1f44d.png👍https://www.facebook.com/images/emoji.php/v6/f7b/1/16/1f44c.png👌https://www.facebook.com/images/emoji.php/v6/f7b/1/16/1f44c.png👌https://www.facebook.com/images/emoji.php/v6/f7b/1/16/1f44c.png👌https://www.facebook.com/images/emoji.php/v6/ffb/1/16/263a.pnghttps://www.facebook.com/images/emoji.php/v6/ffb/1/16/263a.pnghttps://www.facebook.com/images/emoji.php/v6/ffb/1/16/263a.png
1)
जमिनीचा सातबारा उतारा पाहणे :
ज्या गावातील जमींन खारेदी करावयाची असेल तेथिल गावच्या तलाठ्या कडून जमिनीचा नवीन सातबारा काढून घ्यावा. त्यावर असलेले फेरफार आठ तपासून पाहावा.
सातबारा पहाताना वर्ग नोंद असली तर ती जमीन विक्री करणा-याची स्वतःच्या मालकी वहिवाटीची असून सदर जमीन खरेदी करण्यास विशेष अडचण येत नाही.
परंतु नि..प्र.(नियंत्रित सत्ता प्रकार किवा वर्ग ) अशी नोंद असेल तर सदर जमीन कुळ वाहिवाटी मार्फत मिळविलेली असते. अशी जमीन खरेदी करणे पूर्वी संबंधित कुळाला विक्री करण्यासाठी प्रांत अधिकारी यांची परवानगी घेणे अपरिहार्य ठरते. ही परवानगी खरेदी करते वेळी घेणे आवश्यक असते. या करीता ३२ प्रमाणपत्र वगैरे -याच कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. यासाठी साधारणत: एक महिना कालावधी लागतो. प्रांत अधिकारी यांची परवानगी मिळल्यावर खरेदीखत करता येते.
2)
कोणतीही जमीन खरेदी करताना खालील गोष्टींचा आढवा घ्यावा.
a)
जमिनी पर्यंतचा रस्ता - जमीन बिनशेती असल्यास जमिनी पर्यंतचा रस्ता नकाशामध्ये दाखवीलेला असतो परंतु जमीन बिनशेती नसल्यास खाजगी रस्ता असल्यास रस्त्यासाठी दाखवीलेली जमीन संबंधित मालक यांची हरकत नसल्याची खात्री करावी.
b)
आरक्षीत जमिनी - शासनाने सदर सदर जमिनी मध्ये कोणत्याही करणासाठीचे आरक्षण उदा. हिरवा पट्टा पिवळा पट्टा इं. नसल्याची खात्री करावी.
c)
वाहिवाटदार - सातबारावरील मुळ मालक प्रत्यक्ष जमिनीचा वहिवाटदार वेगवेगळे असू शकतात याची खात्री कारावी.
d)
सातबारावरील नावे - सातबारावरील नावे ही विक्री करन-या व्यक्तीचिंच आहे का ते पहावे. त्यावर मयत व्यक्ती किवा जुना मालक इतर वारसांची नावे असल्यास ती काढून घेणे आवश्यक असते.
e)
कर्जप्रकरण, नयालयीन खटला भाडेपट्टा - जमिनीवर कोणत्याही बॅंक किवा संस्था यांच्या कर्जाचा बोजा नसल्याची खात्री करावी. तसेंच न्यायालायीन खटला चालू असल्यास संदर्भ तपासून पहावे.कोणतीही जमीन खरेदी करताना प्रथम वकिलाचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
f)
जमिनीची हद्द - जमिनीची हद्द नकाशा प्रमाणे मोजून तपासून घ्यावी. लगतच्या जमीन मालकांची हरकत नसल्याची खात्री करावी.
g)
इतर अधिकारांची नोंद - सातबारावर इतर अधिकारमध्ये नावे असतील तर आवश्यक ती माहिती करूं घेणे. किवा बक्षीसपत्राने मिळलेल्या जमिनींची विशेष काळजी घ्यावी.
h)
बिनशेती करणे - शेतघर सोडून कोणत्याही कारणासाठी बांधकाम करावयाचे असल्यास बांधकामाच्या प्रकारा प्रमाणे बिनशेती करणे आवश्यक असते शहरात असल्यास तूं प्लानिंग प्रमाणे करवी.
i)
संपादित जमिनी - सदर जमिनीमधून नियोजित महामार्ग, रेल्वे मार्ग, तलाव . नसल्याची खात्री करावी. याची सातबारावर नोंद पहावी. तसेच जमिनियाच्या बाजून रस्ता, नदी, महामार्ग, असेळ तर त्यापासूनचे योग्य अंतर सोडून पुरेशी जमीन असल्यास खरेदी करावी.
j)
खरेदीखत - तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून आवश्यक शुल्क भरून खरेदीखत करावे.
योग्य कालावधी नंतर खरेदी केलेल्या जमिनिचा नकाशा आपल्या नावे सातबारा खात्री करावी
3)
वेळोवेळी बदलणारे शासन नियम पडताळून पहावेत. 
4)
जमीन खरेदी देतांना:
जमिन मालकाने आर्थिक व्यवहार पूर्ण झाल्याशिवाय खरेदीखत करू नये. खरेदीखत करताना दिलेली जमीन सातबारा यांची खात्री करावी.
====================================================
2.
जमिनीचा #सातबारा आपल्या नावे केव्हा होतो✔✔✔https://www.facebook.com/images/emoji.php/v6/ffc/1/16/1f44d.png👍https://www.facebook.com/images/emoji.php/v6/ffc/1/16/1f44d.png👍https://www.facebook.com/images/emoji.php/v6/ffc/1/16/1f44d.png👍https://www.facebook.com/images/emoji.php/v6/f7b/1/16/1f44c.png👌https://www.facebook.com/images/emoji.php/v6/f7b/1/16/1f44c.png👌https://www.facebook.com/images/emoji.php/v6/f7b/1/16/1f44c.png👌https://www.facebook.com/images/emoji.php/v6/ffb/1/16/263a.pnghttps://www.facebook.com/images/emoji.php/v6/ffb/1/16/263a.pnghttps://www.facebook.com/images/emoji.php/v6/ffb/1/16/263a.png
जमिनीचा सातबारा आपल्या नावे केव्हा होतो,
खरेदीखत जमीन विक्री केल्यानंतर होते. खरेदीखत झाल्यानंतर काही दिवसातच दुय्यम निबंधक कार्यालयातून अविवरण पत्रक
तहसीलदार कार्यालयात पाठविले जातात. त्यानंतर संबधित तलाठी कार्यालयात हे विवरण पत्रक पाठविले जातात.
त्यानंतर तलाठी सातबारावारील सर्वांना नोटीसा काढतात. नोटीस सही करून अल्यानंतर सातबारावरील जुनी नावे कमी होऊन
नवीन मालकाची नावे नोंदाविली जातात.
वर्ग च्या विक्रीची परवानगी
सातबारावर जमिनिचा प्रकार यामध्ये वर्ग असा उल्लेख असेल तर प्रांत अधिकारी यांची परवानगीची आवश्यकता नसते,.
परंतु वर्ग असे असल्यास परवानगीची आवश्यकता असते. कारण अशा जमिनी भोगवटदाराला केवळ कसण्याचा
अधिकार असतो विकण्याचा नसतो. सदर भोगवटदार हा या जमिनिचा कुळ म्हणून असतो हि जमीन कुळकायदयाने
मिळालेली असते थोडक्यात या जमिनी म्हणजे सरकारी मालमत्ता असतात.
अशा जमिनीच्या विक्रीच्या परवानगी साठी प्रांत ऑफिंस मध्ये खालीअल कागदपत्रांची पुर्तता करावी लागते.
. जमिनीचा नवीन सातबारा
. जमिनीवरील सर्व फेरफार
. आठ
. जमीनीचा नकाशा
. अर्ज
अर्जासोबत सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती जोडून प्रांत ऑफिस मध्ये दाखल करावेत. सर्व कागदपत्रांची
छाननी करून एका महिन्यात प्रांत ऑफिसरच्या पर्वांगीची प्रत मिळते. मिळालेल्या परवनगी मध्ये फक्त सहा महिन्याचा
कलावधी असतो. सहा महिन्यात जमीन विक्री करावी लागते अथवा सहा महिन्यांनी हि परवानगी संपते.
बिनशेती (Non Agricultur)
कोणत्याहि जमिनी मध्ये घर बांधावयाचे झाल्यास ती जमीन प्रथम बिनशेती करावी लागते. शेत जमीन किवा इतर
कोणत्याही प्रकारच्य जमिनीमध्ये घर बांधता येंत नाही.
जर शेत घर बांधावयाचे असल्यास स्वतः शेतकरी असावे लागते. त्याचप्रमाणे आपल्या शेत जमिनी असाव्या लागतात
आणि ती शेती करावी लागते. आणि तसे पुरावे असावे लागतात.
जमीन बिनशेती करायची असल्यास पुढील कागदपत्रांची आवश्यकता असते.
जमिनीचा सातबारा
जमिनिचा नकाशा
टाउन प्लानिंगची परवानगी
अर्ज
सदर अर्जासोबत सर्व कागदपत्रे जोडून संबधित प्रांत अधिकारी कीवा तहसीलदार यांच्या कार्यालयात सदर करावे लागतात.
जमिनीच्या नकाशामध्ये लागून रस्ते असल्यास अडचण येंत नाही पण तसे नसेल तर घरापर्यंत जण्याकरीता रस्ता दाखवावा
लगतो. म्हणजेच सदर जमनीपर्यंत जाण्यासाठी रस्त्यासाठी जमीन विकत घ्यवी लागते.
खरेदीखत कसे करावे.
खरेदीखत म्हणजे जमिनीचा व्यवहार पूर्ण केल्याच पुरावा असतो.
खरेदिखत करण्यापूर्वी जमीन खरेदी करणार्याने जमीन मालकाला ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे सर्व रक्कम पूर्ण करायची असते.
जर सर्व रक्कम पूर्ण झाली नसेल तर खरेदीखत करू नये. कारण एकदा खरेदीखत झाले की नंतर जमीन मालक हा त्या
जमिनीवरचा मालकी हक्क काढून घेत असतो. आणि खरेदीखत सहजासहजी रद्द होत नाही. रद्द करण्याचा अधिकार फक्त
सर्वोच्च न्यायालयाला असतो. पण तसे मोठे पुरावे असावे लागतात. खरेदीखताची नोंदणी संबंधित दुय्यम निबंधक कर्यालयात 
झाल्यानंतर काही दिवसातच सातबारा नवीन मालकाच्या नावे होतो.
खरेदीखत करण्यासाठी ज्या गावातील जमीन असेल त्या संबधित दुय्यम निबंधक कार्याकायात जाऊन बाजारभावे आणि आपपसातील
ठरलेल्या रक्कमेवर मुल्यांकन करून मुद्रांकशुल्क काढून घ्यावे.
जमिनीचे मुल्यांकन हे जमिनीच्या प्रकाराप्रमाणे ठरलेले असते. आणि त्याचे सर्व दरपत्रक (रेडीरेकनर) त्या त्या तालुक्याच्या
दुय्यम निबंधक अधिकारी यांच्या कार्यालयात उपलब्ध असतात. आणि मुल्यांकन काढून देण्याचे काम हे दुय्यम निबंधाकाचेच असते.
यामध्ये जमिनीची सरकारी किंमत आणि प्रत्यक्ष जमीन मालक खरेदीदार यांच्यातील ठरलेल्या व्यवहारावर जी रक्कम जास्त
असते त्यावर मुल्यांकन करून जास्त मुद्रांकशुल्क गृहीत धरला जातो.
मुद्रांकशुल्क काढून झाल्यावर दु.नि. हे खरेदीखत दस्तऐवजासाठी लागणारे नोंदणीशुल्क कागदपत्रे इतर कार्यालयीन खर्चाची माहिती देतात.
हि सर्व माहिती घेऊन दु. नि. यांनी ठरवून दिलेल्या मुद्रांकशुल्कावर आवश्यक ती माहिती लिहून उदा. सर्वे नं. जमिनीचे क्षेत्र,
जमिनीचा प्रकार, जमीन मालकांची नावे, जमीन खरेदी करण-याचे प्रयोजन त्याचप्रमाणे जमीन विकण्याचे प्रयोजन नमूद करावे लागते.
तसेच लागणारी सर्व कागदपत्रे जोडून खरेदीखत तयार करावे. यासोबत संगणकावर डाटाएंट्री करण्यसाठी लागणारा input भरून
दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीसाठी सदर करावा.
खारेदिखतासाठी लागणारी कागदपत्रे --
) सातबारा
) मुद्रांकशुल्क
) आवश्यक असल्यास फेरफार
) आठ
) मुद्रांक शुल्काची पावती
) दोन ओळखीच्या व्यक्ती, त्यांचे फोटो प्रुफ
) आवश्यक असल्यास प्रतिज्ञापत्र
) N A order ची प्रत
) विक्री परवानगीची प्रत
====================================================
3. 
#व्यावहारिक (y) जगात लागणारे काही महत्वाची #जमिनीची_क्षेत्रफळाची (y) रुपांतरे ; ✔✔✔✔https://www.facebook.com/images/emoji.php/v6/ffc/1/16/1f44d.png👍https://www.facebook.com/images/emoji.php/v6/ffc/1/16/1f44d.png👍https://www.facebook.com/images/emoji.php/v6/ffc/1/16/1f44d.png👍https://www.facebook.com/images/emoji.php/v6/f7b/1/16/1f44c.png👌https://www.facebook.com/images/emoji.php/v6/f7b/1/16/1f44c.png👌https://www.facebook.com/images/emoji.php/v6/f7b/1/16/1f44c.png👌https://www.facebook.com/images/emoji.php/v6/ffb/1/16/263a.pnghttps://www.facebook.com/images/emoji.php/v6/ffb/1/16/263a.pnghttps://www.facebook.com/images/emoji.php/v6/ffb/1/16/263a.png
हेक्टर = १०००० चौ. मी . 
एकर = ४० गुंठे 
गुंठा = [३३ फुट x ३३ फुट ] = १०८९ चौ फुट 
हेक्टर= .४७ एकर = .४७ x ४० = ९८. गुंठे
आर = गुंठा 
हेक्टर = १०० आर
एकर = ४० गुंठे x [३३ x ३३] = ४३५६० चौ फुट
चौ. मी . = १०.७६ चौ फुट
/१२ वाचन करते वेळी पोट खराबी हे वाक्य असतत्याचा अर्थ पिक लागवडी साठी योग्य नसलेले क्षेत्रपरंतु ते मालकी हक्कात मात्र येत!!!!! 
नमुना नंबर म्हणजे एकूण जमिनीचा दाखला या मध्ये अर्जदाराच्या नावावर असलेली त्या विभागातील [तलाठी सज्जा] मधील जमिनीचे एकूण क्षेत्र याची यादी असते!!!! 
जमिनी ची ओळख हि त्याच्या तलाठी यांनी प्रमाणित केलेली आणि जागेशी सुसंगत असलेल्या चतुर्सिमा ठरवितात!!!!
कृपया पोस्ट वाचावी अत्यंत महत्वाचे आहे. ग्रामपंचायत 
एक स्वराज्य संस्था जिथे स्थानिक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असते (घटनेच्या चौकटीत राहून) तसेच स्वयंपूर्तीसाठी विविध योजना तयार करून राबविण्याची संपूर्ण अधिकार असलेली घटनात्मक संस्था. ग्रामपंचायत म्हणजेच राज्य शासनाचे विविध कार्य राबविणारे एक केंद्र, ग्रामस्थ आणि शासन ह्यांच्यामधी दुवा.
ग्रामपंचायतींच्या अखत्यारीत येणारे विषय :
. भूविकास
. जमीन सुधारणांची अंमलबजावणी
. जमिनीचे एकत्रीकरण
. मृदुसंधारण
. लघु पाट बंधारे
. सामाजिक वनीकरण
. घर बांधणी
. खादी ग्रामोद्योग
. कुटिरोद्योग
१०. रस्ते, नाले, पूल
११. पिण्याचे पाणी
१२. दळण वळणाची इतर साधने
१३. ग्रामीण विद्युतीकरण
१४. अपारंपरिक उर्जा साधने
१५. दारिद्रय निर्मुलन
१६. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण
१७. बाजार आणि जत्रा
१८. रुग्णालये आणि कुटुंब कल्याण
१९. महिला आणि बालविकास
२०. प्रौढ शिक्षण
२१. सांस्कृतिक कार्यक्रम
२२. सार्वजनिक वितरण
२३. उत्पादनाच्या बाबी
https://www.facebook.com/images/emoji.php/v6/f33/1/16/2705.png
ग्रामपंचायतींची कार्ये:
. कृषीजमीन सुधारणा, धान्य कोठारांची निर्मिती, कंपोष्ट खात निर्मिती, सुधारित बियाणांचा वापर, सुधारित शेती प्रोत्साहन
. पशु संवर्धनपशुधनाची काळजी, संकरीत गुराच्या पैदाशीसाठी प्रयत्न करणे, दुग्धोत्पादन वाढविणे, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करणे
. समाजकल्याणदारूबंदीस प्रोत्साहन, जुगार आणि अस्पृश्यता नष्ट करणे, महिला/बालकल्याणाच्या योजना लाभार्थींपर्यंत पोहोचविणे.
. शिक्षणप्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षणाची सोय करणे, गावाचा शैक्षणिक विकास
. आरोग्यसार्वजनिक विहीर, गटारे आणि परिसर स्वच्छ राखणे, शासकीय योजना राबविणे, शुद्ध जल पुरवठा
. रस्ते बांधणीरस्ते, पूल, साकव यांची बांधकामे करणे, सार्वजनिक बाग, क्रीडांगणे, सचिवालय बंधने
. ग्रामोद्योग आणि सहकारस्वयं रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे, कार्यकारी संस्था/पतपेढ्या स्थापणे
. प्रशासन - महसुलाची कागदपत्रे अद्ययावत करणे, सार्वजनिक मालमत्तेची नोंद ठेवणे, घरांची नोंद ठेवणे, जन्म, मृत्यू आणि विवाहाची नोंद ठेवणे, बक्षिसांची नोंद, अतिक्रमणे हटविणे 
आपणास आवश्यक असलेली माहिती कोणत्या नोंदवहीत असते याबाबत ही माहिती.
*
गाव नमुना नंबर - 1 - या नोंदवहीमध्ये भूमी अभिलेख खात्याकडून आकारबंध केलेला असतो, ज्यामध्ये जमिनीचे गट नंबर, सर्व्हे नंबर दर्शविलेले असतात जमिनीचा आकार (ऍसेसमेंट) बाबतती माहिती असते.
*
गाव नमुना नंबर - 1 - या नोंदवहीमध्ये वन जमिनीची माहिती मिळते. गावातील वन विभागातील गट कोणते हे समजते. तशी नोंद या वहीत असते.
*
गाव नमुना नंबर - 1 - या नोंदवहीमध्ये सरकारच्या मालकीच्या जमिनीची माहिती मिळते.
*
गाव नमुना नंबर - 1 - या नोंदवहीमध्ये कुळ कायदा, पुनर्वसन कायदा, सिलिंग कायद्यानुसार भोगवटादार यांना दिलेल्या जमिनी याबाबतची माहिती असते. सातबाराच्या उताऱ्यामध्ये नवीन शर्त असल्यास जमीन कोणत्या ना कोणत्या तरी पुनर्वसन कायद्याखाली किंवा वतनाखाली मिळालेली जमीन आहे असे ठरविता येते.
*
गाव नमुना नंबर - 1 - या नोंदवहीमध्ये कुळवहिवाट कायदा अथवा सिलिंग कायद्यानुसार अतिरिक्त जमिनी, त्यांचे सर्व्हे नंबर गट नंबर याबाबतची माहिती मिळते.
*
गाव नमुना नंबर - 1 - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनींवरील अतिक्रमण त्याबाबतची कार्यवाही ही माहिती मिळते.
*
गाव नमुना नंबर - 2 - या नोंदवहीमध्ये गावातील सर्व बिनशेती (अकृषिक) जमिनींची माहिती मिळते.
*
गाव नमुना नंबर - 3 - या नोंदवहीत दुमला जमिनींची नोंद मिळते. म्हणजेच देवस्थाना साठीची नोंद पाहता येते.
*
गाव नमुना नंबर - 4 - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीचा महसूल, वसुली, विलंब शुल्क याबाबतची माहिती मिळते.
*
गाव नमुना नंबर - 5 - या नोंदवहीत गावाचे एकूण क्षेत्रफळ, गावाचा महसूल, जिल्हा परिषदेचे कर याबाबतची माहिती मिळते.
*
गाव नमुना नंबर - 6 - (हक्काचे पत्रक किंवा फेरफार) या नोंदवहीमध्ये जमिनीच्या व्यवहारांची माहिती, तसेच खरेदीची रक्कम, तारीख कोणत्या नोंदणी कार्यालयात दस्त झाला याची माहिती मिळते.
*
गाव नमुना नंबर - 6 - या नोंदवहीमध्ये फेरफारास (म्युटेशन) हरकत घेतली असल्यास त्याची तक्रार चौकशी अधिकाऱ्यांचा निर्णय याबाबतची माहिती मिळते.
*
गाव नमुना नंबर - 6 - या नोंदवहीमध्ये वारस नोंदीची माहिती मिळते.
*
गाव नमुना नंबर - 6 - या नोंदवहीमध्ये जमिनीचे पोटहिस्से, तसेच वाटणी किंवा भूमी संपादन याबाबतची माहिती मिळते.
*
गाव नमुना नंबर - 7 - (7/12 उतारा) या नोंदवहीमध्ये जमीन मालकाचे नाव, क्षेत्र, सर्व्हे नंबर, हिस्सा नंबर, गट नंबर, पोट खराबा, आकार, इतर बाबतीची माहिती मिळते.
*
गाव नमुना नंबर - 7 - या नोंदवहीमध्ये कुळ वहिवाटीबाबतची माहिती मिळते. उदा. कुळाचे नाव, आकारलेला कर खंड याबाबतची माहिती मिळते.
*
गाव नमुना नंबर - 8 - या नोंद
वहीत जमिनीची नोंद, सर्व्हे नंबर, आपल्या नावावरील क्षेत्र इतर माहिती मिळते.
*
गाव नमुना नंबर - 8, - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या महसूल वसुलीची माहिती मिळते.
*
गाव नमुना नंबर - 9 - या नोंदवहीत शासनाला दिलेल्या पावत्यांची माहिती मिळते.
*
गाव नमुना नंबर - 10 - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या जमा झालेल्या महसुलाची माहिती मिळते.
*
गाव नमुना नंबर - 11 - या नोंदवहीत प्रत्येक गटामध्ये सर्व्हे नंबर, पीकपाणी झाडांची माहिती मिळते.
*
गाव नमुना नंबर - 12 15 - या नोंदवहीमध्ये पिकाखालील क्षेत्र, पडीक क्षेत्र, पाण्याची व्यवस्था इतर बाबतीची माहिती मिळते.
*
गाव नमुना नंबर - 13 - या नोंदवहीमध्ये गावाची लोकसंख्या गावातील जनावरे याबाबतची माहिती मिळते.
*
गाव नमुना नंबर - 14 - या नोंदवहीमध्ये गावाच्या पाणीपुरवठ्याबाबतची माहिती, तसेच वापरली जाणारी साधने याबाबतची माहिती मिळते.
*
गाव नमुना नंबर - 16 - या नोंदवहीमध्ये माहिती पुस्तके, शासकीय आदेश नवीन नियमावली याबाबतची माहिती मिळते.
*
गाव नमुना नंबर - 17 - या नोंदवहीमध्ये महसूल आकारणी याबाबतची माहिती मिळते.
*
गाव नमुना नंबर - 18 - या नोंदवहीमध्ये सर्कल ऑफिस, मंडल अधिकारी यांच्या पत्रव्यवहाराची माहिती असते.
*
गाव नमुना नंबर - 19 - या नोंदवहीमध्ये सरकारी मालमत्तेबाबतची माहिती मिळते.
*
गाव नमुना नंबर - 20 - पोस्ट तिकिटांची नोंद याबाबतची माहिती मिळते.
*
गाव नमुना नंबर - 21 - या नोंदवहीमध्ये सर्कल यांनी केलेल्या कामाची दैनंदिन नोंद याबाबतची माहिती मिळते.
अशा प्रकारे तलाठी कार्यालयात सामान्य नागरिकांना गाव कामगार तलाठी यांच्याकडून वरील माहिती विचारणा केल्यास मिळू शकते. आपणास आपल्या मिळकतीबाबत गावाच्या मिळकतीबाबत माहिती मिळाल्यामुळे मिळकतीच्या मालकी वहिवाटीसंबंधीचे वाद कमी होण्यास मिटण्यास मदत होऊ शकते असे वाटते

No comments

Web Analytics