G Ad

ई-हक्क प्रणाली (PUBLIC DATA ENTRY (PDE)

प्रस्तावना -
                         जमाबंदी आयुक्त कार्यालयाच्या वतीने व जिल्हाधिकारी पुणे यांच्या मदतीने ई हक्क नावाने एक नवीन ऑनलाईन आज्ञावली ( PDE – Public Data Entry ) विकसित करणेत आले असून या मध्ये कोणत्याही खातेदाराला / संबंधित व्यक्तीला तलाठी कार्यालयाकडे वेगवेगळ्या हक्काच्या नोंदी ७/१२ वर फेरफार च्या स्वरुपात घेण्यासाठी जे अर्ज करावे लागतात ते अर्ज ऑनलाईन पद्धतीने तलाठी कार्यालयात न जाता घरी बसून देखील दाखल करता येतील . या मध्ये सध्या पहिल्या टप्प्यात आठ फेरफार प्रकारचे अर्ज दाखल करता येतील .
फेरफार घेण्यासाठीचे अर्ज संबंधित खातेदार अथवा संबंधित व्यक्तीला ई हक्क प्रणालीतून ऑनलाईन पद्धतीने दाखल  करता येतील . अशा फेरफार प्रकारासाठी कोणती कागदपत्र जोडावी लागतील त्यांचे यादी देणेत आली असून असी कागदपत्रे  स्कॅन करून ( स्वयं साक्षांकित प्रत ) पीडीएफ स्वरुपात अपलोड करता येतील .
            अशा पद्धतीने दाखल केलेल्या प्रत्येक अर्जाला अर्ज नंबर ( Aplicatiopn ID) मिळेल व त्याची ऑनलाईन पोहोच देखील अर्जदाराला मिळेल व अश्या अर्जांची स्थिती अर्जदाराला प्रत्येक टप्प्यावर तपासता येईल . प्रत्येक टप्प्यावर अर्ज स्वीकारला , काय कारण देयून परत पाठवला ? , फेरफार तयार केला का ? नोटीस काढली का? नोटीस बजावनेत आली का ? रुजू करणेत आली का? फेरफार  मुदतीत हरकत आली का? फेरफार मंजूर झाला का ? ऑनलाईन ७/१२ दुरुस्त झाला का ? अशा प्रत्येक टप्प्यावर मोबाईलवर मेसेज येईल .  असा भरलेला अर्ज तलाठ्याकडे ऑनलाईन जाईल तो योग्य असल्याची खात्री करून तलाठी तो अर्ज स्वीकारील अथवा कारण देवून  पुन्हा अर्जदाराकडे दुरुस्ती साठी पाठवेल किंवा कारण नमूद करून पुर्णतः नाकारील . या साठी  प्रत्येकं अर्जदाराने या प्रणालीवर मोबाईल नंबर देवून  नोंदणी करणे आवश्यक आहे.

        ई हक्क ही प्रणाली ई फेरफार प्रणालीला पूरक असून त्यामधून केलेले  सर्व अर्ज तलाठी यांना ई फेरफार मध्ये FETCH करून फेरफार मध्ये रुपांतरीत करता येणार आहेत त्यासाठी ही प्रणाली ई फेरफार प्रणाली शी संलग्न करणेत आलेली आहे .

          याच प्रणाली मध्ये माहिती भरून तलाठी देखील फेरफार घेणार आहेत त्यामुळे ऑनलाईन अर्ज आल्यास तलाठ्याला पुन्हा डेटा एन्ट्री करावी लागणार नाही पर्यायाने तलाठी यांना देखील ही प्रणाली सहाय्यभूत ठरणार आहे . वरिष्ठ महसूल अधिकार्यांना देखील अशा सर्व अर्जांचा आढावा घेण्यासाठी MIS करून दिले जाणार आहेत त्यामुळे  महसूल प्रशासनामध्ये पारदर्शकता गतिमानता येण्यास आणखी मदत होईल असा विश्वास आहे.

प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी –
             
             सदर  प्रणाली ची प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी  पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात करण्यात आली आहे आणि तदनंतर  GSDC CLOUD वर स्थानांतरीत केलेला पहिला जिल्हा वाशीम येथे  टेस्टिंग पूर्ण झाले असून लवकरच ई फेरफार प्रणाली सर्व जिल्हे CLOUD वर स्थानांतरीत केल्या नंतर पूर्ण राज्यात उपलब्ध करून दिली जाणार आहे .

उद्देश :-   
१)     कोणत्याही खातेदाराला / संबंधित व्यक्तीला तलाठी कार्यालयाकडे वेगवेगळ्या हक्काच्या नोंदी ७/१२ वर फेरफार च्या स्वरुपात घेण्यासाठी जे अर्ज करावे लागतात ते अर्ज  ऑनलाईन पद्धतीने तलाठी कार्यालयात न जाता घरी बसून दाखल करता यावेत .
२)     अर्जदाराला आपल्या  अर्जांची स्थिती प्रत्येक टप्प्यावर तपासता यावी.
३)     याच प्रणाली मध्ये माहिती भरून तलाठी देखील फेरफार घेणार आहेत त्यामुळे ऑनलाईन अर्ज आल्यास तलाठ्याला पुन्हा डेटा एन्ट्री करावी लागणार नाही पर्यायाने तलाठी यांना देखील ही प्रणाली सहाय्यभूत ठरणार आहे .
४)     वरिष्ठ महसूल अधिकार्यांना देखील अशा सर्व अर्जांचा आढावा घेण्यासाठी MIS करून दिले जाणार आहेत त्यामुळे  महसूल प्रशासनामध्ये पारदर्शकता गतिमानता येण्यास आणखी मदत होईल.

ई-हक्क प्रणालीत समाविष्ट फेरफार प्रकार-
सध्या पहिल्या टप्प्यात पुढील आठ प्रकारचे फेरफार घेण्यासाठीचे फेरफार प्रकार उपलब्ध करण्यात आलेले आहेत.
१. वारस नोंद
२. बोजा दाखल करणे
३. बोजा कमी करणे
४. ई करार नोंदी
५. मयताचे नाव कमी करणे
६. अज्ञानपालनकर्ता चे नाव ( अपाक ) कमी करणे
७. एकत्र कुटुंब पुढारी / म्यानेजर ( एकुम्या ) कमी करणे
८. विश्वास्थांचे नाव कमी करणे

Website-

https://pdeigr.maharashtra.gov.in/frmLogin.aspx

लोगिन :-
—  खातेदार/नागरिकांसाठी –
उक्त website मध्ये जावून नवीन वापरकर्ता नोंदणी हा पर्याय वापरून नोंदणी करावी त्यानुसार आपला Userid आणि Password तयार करावा .
—  तलाठी यांच्या साठी -
user id :  तलाठी यांचा सेवार्थ आय डी
                 Password : तलाठी यांचा ई फेरफार प्रणाली चा पासवर्ड

ई- हक्क प्रणालीमध्ये फेरफाराकरिता अर्ज दाखल करावयाची कार्यपद्धती –
—  याचे दोन भाग आहेत
—  अ)नागरिक/खातेदार(वापरकर्ता) यांच्याकडून फेरफारासंबंधी Data entry, PDE sever मध्ये कागदपत्रे जोडणे आणि तदनंतर  सदर data eferfar database ला webservice  द्वारे पाठविला जाणे.
—  ब) तलाठी यांच्या लोगिन ला सदर data उपलब्ध होणे आणि तलाठी यांनी सदर फेरफार अर्ज पुढे  फेरफार घेण्याकरिता स्वीकारायचा (accept) किंवा नाकारायचा (reject) हे ठरविणे.
१.       नागरिक/खातेदार(वापरकर्ता) यांनी नवीन वापरकर्ता नोंदणी हा पर्याय वापरून नोंदणी केल्यानंतर उक्त website वापरून लोगिन करावे .
२.       सदर पोर्टल हे IGR विभागाचे असल्याने त्यावर ७/१२ फेरफार सोबतच Marriage Registration ,e Registration ,e Filing आणि e Property card यांचा देखील समावेश आहे. त्यामधील ७/१२ फेरफार निवडावे.
३.       तदनंतर संबंधित जिल्हा,तालुका आणि गाव निवडून योग्य फेरफार प्रकार निवडावा.
४.       अर्जदाराने आपली माहिती योग्य प्रकारे नमूद करून मोबाईल नंबर नमूद करावा .सदर मोबाईल नंबरवर अर्जदारास मेसेज येईल त्यानुसार  अर्जांची स्थिती मिळेल व  प्रत्येक टप्प्यावर अर्जाची स्थिती तपासता येईल .
५.       सदर फेरफार प्रकारासाठी कोणती कागदपत्रे जोडावी लागतील त्यांची  यादी देणेत आली असून अशी कागदपत्रे स्कॅन करून ( स्वयं साक्षांकित प्रत )फक्त पीडीएफ स्वरुपात अपलोड करता येतील .सदर कागदपत्रांची साईझ  हि 100 kb मर्यादेपर्यंतच असावी .
६.       अशा पद्धतीने दाखल केलेल्या प्रत्येक अर्जाला अर्ज नंबर ( aplicatiopn ID) मिळेल व त्याची ऑनलाईन पोहोच देखील अर्जदाराला मिळेल.
७.       असा भरलेला अर्ज तलाठ्याकडे ऑनलाईन जाईल तो योग्य असल्याची खात्री करून तलाठी तो अर्ज स्वीकारील अथवा कारण देवून पुन्हा अर्जदाराकडे दुरुस्ती साठी पाठवेल किंवा पूर्णतः कारण नमूद करून नाकारील .
८.       ई हक्क ही प्रणाली ई-फेरफार प्रणालीला पूरक असून त्यामधून केलेलं सर्व अर्ज तलाठी यांना ई फेरफार मध्ये FETCH करून फेरफार मध्ये रुपांतरीत करता येणार आहेत त्यासाठी ही प्रणाली ई फेरफार प्रणालीशी संलग्न करणेत आलेली आहे .
९.       याच प्रणालीमध्ये माहिती भरून तलाठी देखील फेरफार घेणार आहेत त्यामुळे ऑनलाईन अर्ज आल्यास तलाठ्याला पुन्हा डेटा एन्ट्री करावी लागणार नाही .

ई-हक्क फेरफार प्रणालीत समाविष्ट फेरफार प्रकारांसंबंधी HELP या POP UP मध्ये दर्शविण्यात आलेली माहिती
१)     इकरार अर्ज-

डेटा एंन्ट्रीबाबत सूचना :
        आपल्याला एकाच इंग्रजी कि-बोर्डच्या सहाय्याने इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषेत माहिती भरता येईल. वारसांची नावे भरणे किंवा नावावरुन खाते शोधणे ह्या फिल्ड मधील नावे देवनागरी लिपीतच असणे आवश्यक आहे. देवनागरी मधे माहिती भरावयाची असेल तर नावाचे इंग्रजी स्पेलींग टाईप करावे आणि नंतर स्पेस बार द्यावा टाईप केलेला इंग्रजी शब्द मराठीत दिसेल. इंग्रजी नाव टाईप केल्यानंतर स्पेस बार देणे अनिवार्य आहे.
आपल्याला एकाच इंग्रजी कि-बोर्डच्या सहाय्याने इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषेत माहिती भरता येईल. वारसांची नावे भरणे किंवा नावावरुन खाते शोधणे ह्या फिल्ड मधील नावे देवनागरी लिपीतच असणे आवश्यक आहे. देवनागरी मधे माहिती भरावयाची असेल तर नावाचे इंग्रजी स्पेलींग टाईप करावे आणि नंतर स्पेस बार द्यावा टाईप केलेला इंग्रजी शब्द मराठीत दिसेल. इंग्रजी नाव टाईप केल्यानंतर स्पेस बार देणे अनिवार्य आहे. तसेच नावामध्ये काहीही दुरुस्ती असेल ती स्पेस बार देण्यापूर्वी करावी स्पेसबार दाबल्यानंतर दुरुस्ती करण्याकरीता संपूर्ण शब्द खोडून पुन्हा टाईप करावे लागेल. मराठी नाव भरल्यानंतर त्या नावाचे इंग्रजी स्पेलिंग इंग्रजी नावात आपोआप येईल. आपल्याला इंग्रजी नाव पुन्हा टाईप करावे लागणार नाही.
सोसायटी नोंद करण्याकरीता करावयाच्या ऑनलाईन अर्जासाठी खालील माहिती जवळ असणे आवश्यक आहे
१. ज्या जमिनीवर नाव लावायचे ते स्थान (जिल्हा,तालुका,गाव,गट नंबर/ सर्वे नं )
२. अर्जदाराचे संपूर्ण नाव
३. अर्जदाराचा मोबाईल नंबर
४. अर्जदाराचा इ-मेल आय डी (असल्यास)
५. सोसायटी चढविण्यासाठी सोसायटी चे पत्र
खालील कागदपत्रे जोडणे आवश्य आहे (कागदपत्रांच्या स्कॅन कॉपी फक्त ब्लॅक ऍंड व्हाईट पी.डी.एफ फॉर्म मधील)
१. अर्जदाराचे ओळखपत्र
२. सोसायटी इकरारची प्रत
महत्वाच्या बाबी -
१.कागदपत्रे जोडा करताना फाईल प्रकार-PDF आणि फाईल साईझ-100 KB पेक्षा कमी असावी
२.अर्जाची प्रत download करताना अर्जाची प्रत download होत नसल्यास --POP -UP -BLOCK ALWAYS ALLOW करावे
३.प्रत्येक टॅब करुन पुढे जा चे बटन दाबले कि तुमचा अर्ज जेवढा भरला गेलाय तेवढा सेव्ह होतो. कागदपत्रे जोडून झाल्यानंतर तो सबमिट बटन दाबल्यावर पूर्ण सेव्ह होतो. डॅशबोर्डवरील 'Save as Draft' बटनावर क्लिक केल्यास अपूर्ण अर्जांची यादी दिसेल त्यातील योग्य अर्जावर क्लिक करुन तो पूर्ण भरून सबमीट करता येईल.
४.एकदा 'Submit' झालेला अर्ज तलाठ्याकडून पुन्हा परत आल्या शिवाय पुन्हा दुरुस्त करता येणार नाही

२)     बोजा चढविणे अर्ज-

डेटा एंन्ट्रीबाबत सूचना :
          आपल्याला एकाच इंग्रजी कि-बोर्डच्या सहाय्याने इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषेत माहिती भरता येईल. वारसांची नावे भरणे किंवा नावावरुन खाते शोधणे ह्या फिल्ड मधील नावे देवनागरी लिपीतच असणे आवश्यक आहे. देवनागरी मधे माहिती भरावयाची असेल तर नावाचे इंग्रजी स्पेलींग टाईप करावे आणि नंतर स्पेस बार द्यावा टाईप केलेला इंग्रजी शब्द मराठीत दिसेल. इंग्रजी नाव टाईप केल्यानंतर स्पेस बार देणे अनिवार्य आहे. तसेच नावामध्ये काहीही दुरुस्ती असेल ती स्पेस बार देण्यापूर्वी करावी स्पेसबार दाबल्यानंतर दुरुस्ती करण्याकरीता संपूर्ण शब्द खोडून पुन्हा टाईप करावे लागेल. मराठी नाव भरल्यानंतर त्या नावाचे इंग्रजी स्पेलिंग इंग्रजी नावात आपोआप येईल. आपल्याला इंग्रजी नाव पुन्हा टाईप करावे लागणार नाही.
शेतकरी जमिनीवर जे कर्ज घेतात त्याची नोंद गाव न.नं.७/१२ च्या इतर हक्कात घेतली जाते त्याला ’बोजा’ असे म्हणतात. हि नोंद ज्या फेरफाराने होते त्याला ’बोजा चढविणे’ असे म्हणतात . ’बोजा चढविणे’  साठी ऑनलाईन अर्ज नागरिक स्वतः करु शकतात, तलाठी करु शकतात अथवा ज्या बॅंकेकडून कर्ज घेतले आहे ती बॅंक देखील करु शकते.
१. ज्या जमिनीवर नाव लावायचे ते स्थान (जिल्हा,तालुका,गाव,गट नंबर/ सर्वे नं )
२. अर्जदाराचे संपूर्ण नाव
३. अर्जदाराचा मोबाईल नंबर
४. अर्जदाराचा इ-मेल आय डी (असल्यास)
५. बोजा चढविण्यासाठी बँकेचे पत्र अथवा गहानखताच्या दस्ताची प्रत
खालील कागदपत्रे जोडणे आवश्य आहे (कागदपत्रांच्या स्कॅन कॉपी फक्त ब्लॅक ऍंड व्हाईट पी.डी.एफ फॉर्म मधील)
१. अर्जदाराचे ओळखपत्र
२. बँकेच्या पत्राची प्रत अथवा गहानखताची प्रत
महत्वाच्या बाबी -
१.कागदपत्रे जोडा करताना फाईल प्रकार-PDF आणि फाईल साईझ-100 KB पेक्षा कमी असावी
२.अर्जाची प्रत download करताना अर्जाची प्रत download होत नसल्यास --POP -UP -BLOCK ALWAYS ALLOW करावे
३.प्रत्येक टॅब करुन पुढे जा चे बटन दाबले कि तुमचा अर्ज जेवढा भरला गेलाय तेवढा सेव्ह होतो. कागदपत्रे जोडून झाल्यानंतर तो सबमिट बटन दाबल्यावर पूर्ण सेव्ह होतो. डॅशबोर्डवरील 'Save as Draft' बटनावर क्लिक केल्यास अपूर्ण अर्जांची यादी दिसेल त्यातील योग्य अर्जावर क्लिक करुन तो पूर्ण भरून सबमीट करता येईल.
४.एकदा 'Submit' झालेला अर्ज पुन्हा दुरुस्त करता येणार नाही
३)     बोजा कमी करणे

डेटा एंन्ट्रीबाबत सूचना :
       आपल्याला एकाच इंग्रजी कि-बोर्डच्या सहाय्याने इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषेत माहिती भरता येईल. वारसांची नावे भरणे किंवा नावावरुन खाते शोधणे ह्या फिल्ड मधील नावे देवनागरी लिपीतच असणे आवश्यक आहे. देवनागरी मधे माहिती भरावयाची असेल तर नावाचे इंग्रजी स्पेलींग टाईप करावे आणि नंतर स्पेस बार द्यावा टाईप केलेला इंग्रजी शब्द मराठीत दिसेल. इंग्रजी नाव टाईप केल्यानंतर स्पेस बार देणे अनिवार्य आहे.
शेतकरी जमिनीवर जे कर्ज घेतात त्याला ’बोजा’ असे म्हणतात. या कर्जाची ७/१२ नोंद होणे आवश्यक असते. हि नोंद ज्या फेरफाराने होते त्याला ’बोजा चढविणे’ असे म्हणतात . ज्यावेळी शेतकरी कर्ज फेडतात, त्यावेळी ७/१२ वरील ’बोजा’ची नोंद कमी होणे आवश्यक असते. हि नोंद ज्या फेरफाराने होते त्याला ’बोजा कमी करणे’ असे म्हणतात . ’बोजा कमी करणे’ नोंद नागरिक स्वतः करु शकतात, तलाठी करु शकतात अथवा ज्या बॅंकेकडून कर्ज घेतले आहे ती बॅंक देखील करु शकते.
बोजा कमी करणे नोंद करण्याकरीता खालील माहिती जवळ असणे आवश्यक आहे
१. ज्या जमिनीवर नाव लावायचे ते स्थान (जिल्हा,तालुका,गाव,गट नंबर/ व्यक्तिचे नाव)
२. अर्जदाराचे नाव
३. अर्जदाराचा मोबाईल नंबर
४. अर्जदाराचा इ-मेल आय.डी. (असल्यास)
खालील कागदपत्रे जोडणे आवश्य आहे (कागदपत्रांच्या स्कॅन कॉपी फक्त ब्लॅक ऍंड व्हाईट पी.डी.एफ फॉर्म मधील)
१. बँकेच्या पत्राची प्रत
२. ओळखपत्र :-
महत्वाच्या बाबी -
१.कागदपत्रे जोडा करताना फाईल प्रकार-PDF आणि फाईल साईझ-100 KB पेक्षा कमी असावी
२.अर्जाची प्रत download करताना अर्जाची प्रत download होत नसल्यास –POP –UP –BLOCK ALWAYS ALLOW करावे
३.प्रत्येक टॅब करुन पुढे जा चे बटन दाबले कि तुमचा अर्ज जेवढा भरला गेलाय तेवढा सेव्ह होतो. कागदपत्रे जोडून झाल्यानंतर तो सबमिट बटन दाबल्यावर पूर्ण सेव्ह होतो. डॅशबोर्डवरील ‘Save as Draft’ बटनावर क्लिक केल्यास अपूर्ण अर्जांची यादी दिसेल त्यातील योग्य अर्जावर क्लिक करुन तो पूर्ण भरून सबमीट करता येईल.
४.एकदा ‘Submit’ झालेला अर्ज पुन्हा दुरुस्त करता येणार नाही
४)     वारस फेरफार अर्ज-

डेटा एंन्ट्रीबाबत सूचना :
        आपल्याला एकाच इंग्रजी कि-बोर्डच्या सहाय्याने इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषेत माहिती भरता येईल. वारसांची नावे भरणे किंवा नावावरुन खाते शोधणे ह्या फिल्ड मधील नावे देवनागरी लिपीतच असणे आवश्यक आहे. देवनागरी मधे माहिती भरावयाची असेल तर नावाचे इंग्रजी स्पेलींग टाईप करावे आणि नंतर स्पेस बार द्यावा टाईप केलेला इंग्रजी शब्द मराठीत दिसेल. इंग्रजी नाव टाईप केल्यानंतर स्पेस बार देणे अनिवार्य आहे. तसेच नावामध्ये काहीही दुरुस्ती असेल ती स्पेस बार देण्यापूर्वी करावी स्पेसबार दाबल्यानंतर दुरुस्ती करण्याकरीता संपूर्ण शब्द खोडून पुन्हा टाईप करावे लागेल. मराठी नाव भरल्यानंतर त्या नावाचे इंग्रजी स्पेलिंग इंग्रजी नावात आपोआप येईल. आपल्याला इंग्रजी नाव पुन्हा टाईप करावे लागणार नाही.
महत्वाच्या बाबी -
१.कागदपत्रे जोडा करताना फाईल प्रकार-PDF आणि फाईल साईझ-100 KB पेक्षा कमी असावी
२.अर्जाची प्रत download करताना अर्जाची प्रत download होत नसल्यास --POP -UP -BLOCK ALWAYS ALLOW करावे
३.प्रत्येक टॅब करुन पुढे जा चे बटन दाबले कि तुमचा अर्ज जेवढा भरला गेलाय तेवढा सेव्ह होतो. कागदपत्रे जोडून झाल्यानंतर तो सबमिट बटन दाबल्यावर पूर्ण सेव्ह होतो. डॅशबोर्डवरील 'Save as Draft' बटनावर क्लिक केल्यास अपूर्ण अर्जांची यादी दिसेल त्यातील योग्य अर्जावर क्लिक करुन तो पूर्ण भरून सबमीट करता येईल.
४.एकदा 'Submit' झालेला अर्ज पुन्हा दुरुस्त करता येणार नाही

५)     मयताचे नाव कमी करणे-

डेटा एंन्ट्रीबाबत सूचना :
          आपल्याला एकाच इंग्रजी कि-बोर्डच्या सहाय्याने इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषेत माहिती भरता येईल. वारसांची नावे भरणे किंवा नावावरुन खाते शोधणे ह्या फिल्ड मधील नावे देवनागरी लिपीतच असणे आवश्यक आहे. देवनागरी मधे माहिती भरावयाची असेल तर नावाचे इंग्रजी स्पेलींग टाईप करावे आणि नंतर स्पेस बार द्यावा टाईप केलेला इंग्रजी शब्द मराठीत दिसेल. इंग्रजी नाव टाईप केल्यानंतर स्पेस बार देणे अनिवार्य आहे. तसेच नावामध्ये काहीही दुरुस्ती असेल ती स्पेस बार देण्यापूर्वी करावी स्पेसबार दाबल्यानंतर दुरुस्ती करण्याकरीता संपूर्ण शब्द खोडून पुन्हा टाईप करावे लागेल. मराठी नाव भरल्यानंतर त्या नावाचे इंग्रजी स्पेलिंग इंग्रजी नावात आपोआप येईल. आपल्याला इंग्रजी नाव पुन्हा टाईप करावे लागणार नाही. एखाद्या जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर नावे असलेल्या व्यक्तींपैकी एखाद्या व्यक्तीचा मॄत्यू झाल्यास व त्या मयात व्यक्तीला असलेले सर्व वारसांची नावे यापूर्वीच ७/१२ वर दाखल असल्यास फक्त त्याचे नाव ७/१२ उताऱ्यावरुन काढून टाकणे आवश्यक असते. त्यामुळे फक्त मयत व्यक्तीचे नाव कमी करण्याकरीता या फेरफार प्रकारचा चा उपयोग करावा.
मयताचे नाव कमी करणे ची फेरफार नोंद करण्याकरीता करावयाच्या ऑनलाईन अर्जा साठी खालील माहिती जवळ असणे आवश्यक आहे.
१. ज्या जमिनीवर नाव लावायचे ते स्थान (जिल्हा,तालुका,गाव,गट नंबर/मृत व्यक्तिचे नाव)
२. संपूर्ण नाव( मयत व्यक्तीचे )
३. मयत व्यक्तीचा आधार क्रमांक
४. अर्जदाराचे नाव व मोबाईल नंबर
५. इ-मेल आय डी (असल्यास)
खालील कागदपत्रे जोडणे आवश्य आहे (कागदपत्रांच्या स्कॅन कॉपी फक्त ब्लॅक ऍंड व्हाईट पी.डी.एफ फॉर्म मधील)
१.अर्जदाराचे ओळखपत्र
२.मृत्यूचा दाखला
3.स्वयंघोषणा संमती पत्र ( या मध्ये सर्व वारसांची माहिती असावी )
महत्वाच्या बाबी -
१.कागदपत्रे जोडा करताना फाईल प्रकार-PDF आणि फाईल साईझ-100 KB पेक्षा कमी असावी
२.अर्जाची प्रत download करताना अर्जाची प्रत download होत नसल्यास --POP -UP -BLOCK ALWAYS ALLOW करावे
३.प्रत्येक टॅब करुन पुढे जा चे बटन दाबले कि तुमचा अर्ज जेवढा भरला गेलाय तेवढा सेव्ह होतो. कागदपत्रे जोडून झाल्यानंतर तो सबमिट बटन दाबल्यावर पूर्ण सेव्ह होतो. डॅशबोर्डवरील 'Save as Draft' बटनावर क्लिक केल्यास अपूर्ण अर्जांची यादी दिसेल त्यातील योग्य अर्जावर क्लिक करुन तो पूर्ण भरून सबमीट करता येईल.
४.एकदा 'Submit' झालेला अर्ज पुन्हा दुरुस्त करता येणार नाही
६)     अ.पा.क.शेरा कमी करणे- 

            एखाद्या जमीनीवर नावे असलेल्या व्यक्तींपैकी कोणी व्यक्ती कायद्याने अज्ञान (१८ वर्षांपेक्षा लहान) असेल तर तिच्या सोबत अज्ञान पालक कर्ता म्हणून सज्ञान व्यक्तीचे नाव ७/१२ उताऱ्यावर लावण्यात येते. अज्ञान व्यक्तीचे वय १८ पूर्ण झाल्यानंतर अज्ञान पालक कर्ता व्यक्तिचे नाव ७/१२ वरुन कमी करण्यात येते. याला ’अ.पा.क. शेरा कमी करणे ’ असे म्हणतात .
अ.पा.क.शेरा कमी करणे नोंद करण्याकरीता खालील माहिती जवळ असणे आवश्यक आहे
१. ज्या जमिनीवर नाव लावायचे ते स्थान (जिल्हा,तालुका,गाव,गट नंबर/मृत व्यक्तिचे नाव)
२. संपूर्ण नाव
३. मोबाईल नंबर
४. इ-मेल (असल्यास)
५. अज्ञान खातेदाराची जंन्मतारीख
खालील कागदपत्रे जोडणे आवश्य आहे (कागदपत्रांच्या स्कॅन कॉपी फक्त ब्लॅक ऍंड व्हाईट पी.डी.एफ फॉर्म मधील )
१. खातेदाराचे वयाचा पुरावा – जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला
२. ओळखपत्र :-
७)     ए. कु.मॅ. नोंद कमी करणे-

         एखाद्या जमिनीवर एखाद्या व्यक्तिची ’एकत्र कुटुंब मॅनेजर ’ अशी नोंद झालेली असेल आणि ती नोंद कमी करून सर्व वारसांची नोंद ७/१२ वर घेण्यासाठी या पर्यायाची निवड करावी
ए. कु.मॅ. नोंद कमी करणे नोंद करण्याकरीता खालील माहिती जवळ असणे आवश्यक आहे १. ज्या जमिनीवर नोंद कमी करायची ते स्थान ( जिल्हा, तालुका, गाव, गट नंबर/ सर्वे नं. )
२. ए. कु.मॅ. नोंद दाखल झालेल्या मूळ / जुन्या फेरफार ची नक्कल
३. अर्जदाराचे नाव व मोबाईल नंबर
४. अर्जदाराचा इ-मेल आय.डी. (असल्यास)
खालील कागदपत्रे जोडणे आवश्य आहे (कागदपत्रांच्या स्कॅन कॉपी फक्त ब्लॅक ऍंड व्हाईट पी.डी.एफ फॉर्म मधील)
१. ए. कु.मॅ. ची नोंद दाखल झालेल्या मूळ फेरफाराची नक्कल
२. मूळ फेरफारातील सहधारकाचे / वारसाचे स्वयंघोषणा संमती पत्र
३.ओळखपत्र :-
८)     विश्वस्तांचे नावे बदलणे –
           ज्या धर्मादाय / सामाजिक / सहकारी संस्था यांच्या विश्वस्तांची नावे दाखल असतात त्या बाबतीत विश्वस्तांचे नावे बदलणे नोंद करण्याकरीता खालील माहिती जवळ असणे आवश्यक आहे.
विश्वस्तांचे नावे बदलणे नोंद करण्याकरीता खालील माहिती जवळ असणे आवश्यक आहे
१. ज्या जमिनीवर विश्वस्तांचे नावे बदलावायचे आहे त्या जमिनीचे स्थान (जिल्हा,तालुका,गाव,गट नंबर/सर्वे नं. )
२. अर्जदाराचे संपूर्ण नाव
३. अर्जदाराचा मोबाईल नंबर
४. अर्जदाराचा इ-मेल आय डी (असल्यास)
५. विश्वस्तांचे नाव बदलणे बाबत चा आदेशाची प्रत
खालील कागदपत्रे जोडणे आवश्य आहे -(कागदपत्रांच्या स्कॅन कॉपी फक्त ब्लॅक ऍंड व्हाईट पी.डी.एफ फॉर्म मधील)
१. ओळखपत्र
२. धर्मदाय आयुक्त यांचं आदेश पत्र

         ई हक्क या प्रणालीत या आठ फेरफार प्रकारचे अर्ज स्वीकारून त्याची यशस्वी अंमलबजावणी केल्या नंतर अन्य अर्ज प्रकारासाठी देखील समावेश केला जाणार आहे . या प्रणालीच्या वापराने महसूल प्रशासनाचे कामकाज अधिक पारदर्शक व गतिमान होण्यास मदत होईल असा विश्वास वाटतो .

No comments

Web Analytics