G Ad

नवीन रस्त्याची मागणी व रस्ता मंजुरीची निर्णय प्रक्रिया



रस्त्याची मागणी करताना शेतकर्यांनी मा.तह्शीलदार यांचे कडे रीतसर अर्ज सादर करणे आवश्यक आहे. यासोबत

.ज्या गटाच्या बांधावरून रस्ता पाहिजे त्याचा कच्चा नकाशा जोडावा.
.ज्या ज्या शेतातून रस्ता जाणार आहे. त्याचे /१२ जोडावा.
.मागणी केलेल्या रस्त्यास जे विरोध करणारे शेत जमीन मालक आहेत त्यांची नावे पत्ते जमल्यास विरोधाचे कारण . बाबींचा उल्लेख करावा.
.मागणी केलेल्या रस्त्यास सहमती देणारे शेत जमीन मालकांचा उल्लेख असावा.
.अर्जदार मागणी करत असलेल्या रस्त्याचे आवश्यक किती कशी ते नमूद करावे.

या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर मा. तह्शीलदार पुढील बाबींची पडताळणी करून निर्णय देतात.

.अर्जदारास शेतात जाण्यासाठी नवीन रस्त्याची आवश्यकता आहे काय ?
.पूर्वीचे शेत मालक त्याच जमिनीत जाण्यासाठी कोणत्या मार्गाचा वापर करीत?
.सदर जमिनीत जाण्यासाठी मोठ्या रस्त्यापासून सर्वात जवळचा रस्ता कोणता.
.जमिनीत जाण्यासाठी दुसरा पर्यायी रस्ता कोणता आहे?
.जमीन कसण्यासाठी साधने शेतकर्याला आपल्या शेतात घेऊन जाता यावेत अशा पद्धतीने रस्ता करणे यात अपेक्षित असते.

.जर अर्जदार वाजवी पेक्षा मोठ्या रस्त्याची मागणी करत असेल तर अर्जदाराने इतर शेतकर्यांना जमिनीचे योग्य भावाने पैसे देणे कायद्याने अपेक्षित आहे.

No comments

Web Analytics