G Ad

संस्था रजिस्ट्रेशन / नवीन संस्था सुरु करणे


सेवाभावी संस्था / मंडळ / शैक्षणिक मंडळ / गरम विकास मंडल अथवा संस्था सुरु करावयाची असल्यास जिल्हा पातळीवर धर्मदायुक्त कार्यालयात संबंधित संस्थेची नोंदणी करून प्रमाणपत्र मिळवणे आवश्यक असते.
संस्था नोंदणी करिता सादर करावयाची कागदपत्रे
.ज्ञापन / विधानपत्र /मेमोरेंडम ऑफ असोसिएशन
.नियम नियमावलीची सत्य प्रत
.संस्था नोंदणी बाबत कार्यकारी मंडलाच्या सर्व सभासदांचे समंती पत्र
.सर्व सभासदांच्या सहीनिशी अधिकारीपत्र
.संस्थेच्या पत्त्याबाबत मालमत्ते बाबतचे अध्यक्ष किंवा सेक्रेटरी यांचे प्रतिज्ञापत्र
रु.१०० कोर्ट फी स्टॅम्प रु.सह.
.अनुसूची एक नियम ,अनुसूची दोन नियम ,अनुसूची सहा नियम १५.
.समंतीपत्र हमीपत्र
.संस्था स्थापनेची ठराविक प्रत
.प्रथम कार्यकारिणीची यादी
१०.संस्थेच्या जागेबाबत जागा मालकाचे नाहरकत प्रमाणपत्र.
११.सर्व सभासदांचे ओळखपत्र पत्त्याचा पुरावा.

महत्वाच्या बाबी :-
  • जी संस्था सुरु करावयाची आहे तीचे नाव इतर संस्थेच्या नावाप्रमाणे नसावे.
  • संस्थेच्या जर व्यक्तीचे किंवा घराण्याचे नाव द्यावयाचे असल्यास त्यांच्या कुटुंबाचे अथवा वारसांचे संस्थेला नाव देण्याबाबतचे ना हरकत प्रमाणपत्र नाव देण्यास समंती पत्र घेणे आवश्यक आहे.
  • संस्थेचे व्यवस्थापकीय मंडळ यांचे वय १८ वर्षे पूर्ण असावे.
  • व्यवस्थापक / सदस्यांची संख्या विषम असावी उदा.,,११.
  • संस्था स्थापने नंतर संस्थेच्या नावाने राष्ट्रीयकृत बँकेत खाते सुरु करावे.
  • जास्तीत जास्त व्यवहार चेकने करावा.
  • दरवर्षी संस्थेचे ऑडित करून घ्यावे.
  • शासकीय योजना / नविन शाळा / प्रकल्प यात संस्थेला योगदान देण्यासाठी किंवा कामे घेण्यासाठी संस्थेचे किमान ऑडित लागतात.


No comments

Web Analytics