G Ad

नकाशावरील आवश्यक बाबी



बांधकाम परवानगीच्या वेळी नकाशावरील आवश्यक बाबी :-

प्लॉट, इमारत, मल्टीस्टोअर, बहुमजली इमारत यांच्या बांधकामाची परवानगी घेण्यापूर्वी नकाशामध्ये त्या इमारतीच्या उपयोगानुसार विविध बाबीचा समावेश असावा लागतो. असे बांधकाम स्वतःसाठी इतरांनाही उपयोगी ठरते. म्हणून या बाबीचा विचार केला जातो. त्याच प्रमाणे जाहिरातीतील मल्टीस्टोअर इमारतीत गाळा विकणे आहे. असा उल्लेख असतो आपण गुंतवणूक म्हणून तो घेतो देखील परंतु नंतर लक्षात येते कि, ज्या सुविधा मल्टीस्टोअर इमारतीत असाव्यात त्या यात नाहीत म्हणजेच आपली फसवणूक झाली आहे. हि फसवणूक टाळण्यासाठी विविध प्रयोजन निहाय काही आवश्यक बाबीची माहिती पुढीलप्रमाणे :-

* . प्लॉटवरील बांधकाम नकाशातील बाबी:-

प्लॉटवरील बांधकाम करते वेळी त्यातील नकाशात खालील बाबी दर्शविलेल्या असाव्यात

. स्केल उत्तर दिशा

. प्लॉटच्या जवळून जाणारे अस्तित्वातील नियोजित रस्ते त्यांची लांबी रुंदी सह.

. मोठा प्लॉट असेल तर त्यातील रस्ते त्याची रुंदी रेषा.

. ग्रेनीज लाईन, चेंबर, सार्वजनिक सुविधा, इलेकट्रीक तारा .

. ज्या कारणांसाठी प्लॉटचा वापर होणार आहे त्याची माहिती.

. ले-आऊट असल्यास प्रत्येक नियोजित प्लॉटचे क्षेत्र आकार.

. जागेचे एकूण क्षेत्र, रस्त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जागा, ओपनस्पेस, बाग, फार्म, क्रीडांगणे, विकास योजनेतील प्लॅन, आरक्षणाखालील जागा या सर्वांची माहिती तसेच शाळा दुकाने अन्य सुविधांसाठी असलेल्या जागांचे क्षेत्र अशा एकूण क्षेत्राच्या किती टक्के आहे याची माहिती द्यावी.

. एकाच प्लॉटचे दोन भाग होणार असतील तर त्या प्लॉटमध्ये होणारी विभागणी वहिवाटीची व्यवस्था.

. प्रत्येक प्लॉटची मापे, प्लॉट मधील इमारतींपेक्षा, किमान सेटबॅक किमान सामायिक अंतरे यांची मापे.

* . इमारतीच्या बांधकाम परवानगीसाठी नकाशातील बाबी :-

इमारतीचे बांधकाम परवानगीसाठी अर्जासोबत इमारतीच्या नकाशात खालील बाबी असाव्यात :-

. सर्व मजल्यांचे प्लॅन, प्रत्येक मजल्याच्या खॊलीचे माप, जिन्याची जागा, त्याची रुंदी, रॅम अन्य बाहेर पडणाऱ्या वाटा, लिफ्ट, लिफ्टची मशिनरी रूम, लिफ्टचा खड्डा या सर्वांचे नेमके ठिकाण कोणते आहे. त्यांची मापे.

. तळमजला त्याचा प्लॅन, वाहनतळाची जागा, माळ चढउतरण्याची जागा, अंतर्गत वाटा.

. इमारतीच्या भोवतालच्या मोकल्याजागी, अस्तित्वात असलेल्या जवळील इतर इमारतीपासूनचे बांधकाम करावयाच्या इमारतीचं अंतर.

. इमारतीचा वापर कशासाठी होणार आहे त्याची माहिती.

. संडास, बाथरूम, मोरया आशाची नेमकी जागा क्षेत्र

. इमारतीचा सेकशन प्लॅन सर्व बाबींसह

. इमारतीचे इलेव्हेशन म्हणजेच प्रत्येक रस्त्यावरून इमारत कशी दिसते ते चित्र.

. उतार नकाशा ज्यात गच्चीचा प्लॅन, पाणी वाहून जाणारी पाईप त्याची छिद्रे असा नकाशा

. दरवाजा, खिडक्या, झरोके यांची मापे.

१०. प्लॉटची उत्तर दिशा दर्शवणारी खून संबंधित प्राधिकरणाच्या नियमान्वये कागदपत्रे किंवा नकाशा.


* सार्वजनिक वापर होणाऱ्या इमारत बांधकाम नकाशातील बाबी :-

विविध उपयोगासाठी लागणाऱ्या उदा. शैक्षणिक इमारती, सभागृहे, हॉल, हॉस्पटल, औद्योगिक इमारती, गोडाउन, जोखमीचा वापर असलेल्या इमारती आदी इमारतीच्या बांधकाम परवानगीसाठी नकाशात विशेष बाबी समाविष्ट करणे आवश्यक त्यातल्या त्यात १५ मीटर पेक्षा जास्त उंची असलेल्या इमारती १५० चौरस मीटर पेक्षा जास्त जागेत बांधकाम होणार असलेल्या इमारतीमध्ये सामान्य इमारती पेक्षा जास्त घटक तपासावे लागतात. त्यामुळे बांधकाम परवाना प्राप्तीसाठी नकाशामध्ये पुढील बाबी समाविष्ट असाव्या :-

. अग्निरोधक प्रणा… Read more            

No comments

Web Analytics