G Ad

मळई जमीन


मळई जमीन म्हणजे काय :-

चिखल, वाळू, माती, इतर पदार्थांचा गाळ साचून नदीच्या काठावर किंवा पात्राच्या किंवा समुद्राच्या बाजूला नकळत हळू हळू जी जमीन तयार होत जाते त्याला मळईची जमीन असे म्हणतात.

अशा जमिनीचा वापर शेतीसाठी करता येतो. परंतु तो करण्याबाबत महसूल तत्वे पाळणे गरजेचे ठरते. शेतकऱ्याने अशा जमिनीचा वापर करून त्यात पिके घेऊन उत्पन्न वाढविता येऊ शकते. या बाबत किमान पातळीवर माहिती असणे आवश्यक आहे. मळई जमीन संदर्भात त्या विषयी वापराबाबत अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून शासन निर्णय झालेले आहेत.

रोमन कायदा :-

रोमन विधीनुसार, अशा रीतीने तयार झालेल्या जमिनीची मालकी तिच्या लगत असलेल्या जमिनीच्या मालकाकडे जात असे मानले जाते.

ब्रिटिश कायदा :-

इंग्लिश विधीमध्येही रोमन विधीप्रमाणेच मळई जमिनी संबंधी तत्वे अवलंबण्यात आलेले आहेत. दोन्ही विधीनुसार नदी काठी गाळ, चिखल, माती, वाळू . पदार्थ पासून तयार झालेली जमिनीची मालकी स्थानिक अधिपती असलेल्या खुद्द राजाकडे हि जाता केवळ लगतच्या जमीन धाराकांकडे जाते.

गाळपेर जमीन म्हणजे काय ?

जी नैसर्गिक प्रक्रियेमध्ये पाणी कमी झाल्याने दिसू लागते आणि सामान्यतः कृषीसाठी उपलब्द होते आणि त्या त्या वेळी अमलात असलेल्या विधीन्वये राज्य शासनाकडे विहित असेल असे नदी, नाले, तलाव, सरोवर, जलाशय, बांध, पाट , जलमार्ग, आणि सर्व स्थिर प्रवाही पाण्याच्या तळाशी स्थित असलेली जमीन परंतु जिच्यामध्ये अधिनियमाचा कलम ३२ ३३ या मध्ये निर्दिष्ट केलेल्या जमिनीचा समावेश होत नाही.                       

भूमिहीन शेतमजूर यांना जमीन प्रदान करणे

जिल्हाधिका-यांना / उपविभागीय अधिका-यांना वर्ग दोनच्या भोगवटादारांना आपल्या जमिनी व्यक्तिश: कसण्यास कबूल असलेल्या आपल्या जवळच्या नातेवाईकांना देणगी म्हणून देण्याची परवानगी देण्याचा अधिकार आहे. मात्र, मालमत्तेवर हक्क सांगणारा एकही कायदेशीर वारस नसावा किंवा अशा रीतीने जमीन देणगी म्हणून देण्यास कोणत्याही वारसाची हरकत नसावी.

मागासवर्ग म्हणजे कोण ?

. अनुसूचित जाती :-

म्हणजेच भारताच्या संविधानाचा अनुच्छेद ३४१ अन्वये अनुसूचित जाती म्हणून समजण्यात येत असतील अशा जाती वंश किंवा जमाती किंवा अशा जातीचे वंशाचे किंवा जमातीचे भाग किंवा त्यातील गट.

. अनुसूचित जमाती :-

म्हणजेच भारताच्या संविधानाचा अनुच्छेद ३४२ अन्वये ३४२ अन्वये अनुसूचित जमाती म्हणून समाजण्यात येत असतील अशा जमाती किंवा जनजाती समूह किंवा अशा जमातीचे किंवा जनसाठी समूहाचे भाग किंवा त्यातील गट.

अनुसूचित जमातीतील व्यक्ती इतर व्यक्तींना स्वत:च्या मालकीच्या जमिनी हस्तांतरित करीत असल्याच्या अनेक तक्रारी शासनाकडे आलेल्या आहेत. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाचे कलम ३६() अन्वये अधिसूचित क्षेत्रामध्ये अनुसूचित जमातीतील व्यक्तींच्या मालकीची जमीन हस्तांतरित करण्याच्या र्सा प्रकरणात परवानगी देण्यास जिल्हाधिका-याला शक्ती प्रदान करण्यात आली आहे. अनुसूचित जमातीतील व्यक्तींचे हितसंबंध अबाधित राखण्याच्या दृष्टीने क्वचितच केवळ -याखु-या कारणासाठी जमीन हस्तांतरित करण्यास परवानगी देणे आवश्यक ठरेल. म्हणून कोणत्याही बाबतीत, शासनाच्या पूर्वमान्यतशिवाय महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाचे कलम ३६ () अन्वये जमिनींचे हस्तांतरण करण्यास परवानगी दिली जाउ नये. कलम ३६ च्या पोटकलम () च्या तरतुदींचा भंग करून करण्यात आलेल्या हस्तांतराच्या संबंधीच्या अधिकार अभिलेख्यातील नोंदी प्रमाणित करू नयेत आणि हस्तांतरण करून घेणाराचे नाव अधिकृत अभिलेखात नोंदू नये.                        

No comments

Web Analytics