G Ad

जातीचे प्रमाणपत्र (एस.सी)

आपण ज्या जातीचे आहोत ती प्रमाणित करणारा सरकारी दस्त ऐवज म्हणजे जातीचा दाखला.

जेव्हा नागरिक विशीष्ट प्रवर्गातील असेल तेव्हा जातीचे प्रमाणपत्र महत्व्याचे ठरते.महाराष्ट्र मध्ये एस.टी./एस.सी./एन.टी./एस.बी.सी./.बी.सी.या प्रवर्गातील जाती प्रमाणपत्र दिले जाते.परंतु केंद्रात एस.टी./एस.सी./ .बी.सी.याच प्रवर्गासाठी जाती प्रमाणपत्र दिले जाते.केंद्रात एन.टी./एस.बी.सी./.बी.सी. यासाठी सेन्ट्रल .बी.सी प्रमाणपत्र दिले जाते. ज्या अंतर्गत विशिष्ट जाती समूहाला विविध सेवा सवलतीचा लाभ घेता येणे शक्य होते.

त्यात प्रामुख्याने -

.सरकारी नोकरीत आरक्षण

.शाळा महाविद्यालयात प्रवेश शुल्कामध्ये पूर्ण किंवा ठराविक सूट

.शैषणिक संस्थेत प्रवेश कोटा.

.काही सरकारी नोकरीत वयोमर्यादेत अतिरिक्त वयाची सूट . शैषणिक शिष्यवृत्ती .आशा विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी जातीचा दाखला सोबतच जात पडताळणी प्रमाणपत्र असणे हि आवश्यक असते.जर विद्यार्थी किंवा नागरिक एस.टी. एस.सी प्रवर्गातील असेल तर असे जर पडताळणी प्रमाणपत्र असणे बंधनकारक असते.

जातीचे प्रमाणपत्र प्राप्त करण्याची पद्धत

जातीचा दाखला प्राप्त करण्यासाठी आता गावो गावी सेतू कार्यालयांची स्थापना झालेली आहे.सर्व सेतू कार्यालय हे मा.तहसिलदार यांच्या आखत्यारीत येतात.त्याच प्रमाणे तहसीलदार कार्यालयात देखील आपण जातीचा दाखला प्राप्त करण्यासाठी प्रस्ताव सादर शकतात. जर आपल्या कुटुंबातील जातीचा दाखला प्राप्त करण्यासाठी प्रथमच प्रस्ताव असल्यास स्थानिक चौकशी, राज्य निवासी प्रमाणपत्र, स्टँप पेपरवर जातीचा उल्लेखासह प्रतिज्ञा पत्र आदी.कागदपत्रांची आवश्यकता असते.

एस.सी (SC) करिता आवश्यक कागदपत्रे

. विहित नमुन्यातील अर्ज कोर्ट फी स्टँप सह.प्रतिज्ञा पत्र नातेवाईकाचे प्रतिज्ञापत्र

. शालासोडल्याचा दाखला जर अर्जदार अशिक्षित असेल तर मुलाचे मुलीचे शाळेचा दाखला.प्राथमिक शाळेचा प्रवेश निर्गम उतारा.

. शासकीय संस्थेत असल्यास सेवा पुस्तिकेच्या पहिल्या पानाचा प्रमाणित उतारा.

. आजोबा,वडील,सख्या भाऊ-बहिण यांची जात नमूद असलेला दाखला म्हणजेच त्यांचा शालेय पुरावा.

. अर्जदार परराज्यातील स्थलांतरीत असल्यास तेथील जातीचे दाखल्याची प्रत.

. मंडळ अधिकारी यांचा गृह चौकशी अहवाल.

. लाईटबिल,घर कर पावती,भाडेपत्र,शिधापत्रिका उतारा.

यासाठी लागणार कालावधी :- १५ दिवस.           
           
जातीचे प्रमाणपत्र (एस.टी)

आपण ज्या जातीचे आहोत ती प्रमाणित करणारा सरकारी दस्त ऐवज म्हणजे जातीचा दाखला.

एस.सी (ST) करिता आवश्यक कागदपत्रे

. विहित नमुन्यातील अर्ज कोर्ट फी स्टँप सह.प्रतिज्ञा पत्र नातेवाईकाचे प्रतिज्ञापत्र

. शालासोडल्याचा दाखला जर अर्जदार अशिक्षित असेल तर मुलाचे मुलीचे शाळेचा दाखला.प्राथमिक शाळेचा प्रवेश निर्गम उतारा.

. शासकीय संस्थेत असल्यास सेवा पुस्तिकेच्या पहिल्या पानाचा प्रमाणित उतारा.

. आजोबा,वडील,सख्या भाऊ-बहिण यांची जात नमूद असलेला दाखला म्हणजेच त्यांचा शालेय पुरावा.

. अर्जदार परराज्यातील स्थलांतरीत असल्यास तेथील जातीचे दाखल्याची प्रत.

. मंडळ अधिकारी यांचा गृह चौकशी अहवाल.

. लाईटबिल,घर कर पावती,भाडेपत्र,शिधापत्रिका उतारा.

यासाठी लागणार कालावधी :- १५ दिवस.        

No comments

Web Analytics