G Ad

नवीन शर्त जमिनीचा शर्तभंग नियमित करणे



नवीन शर्त जमिनीचा शर्तभंग नियमित करण्याच्या प्रक्रियेचे स्वरूप :-

. अर्जदाराचा अर्ज

. तहसीलदार उपविभागीय अधिकारी यांचा नवीन शर्तीच्या जमीन विक्रीबाबत विहित सूचीमध्ये अहवाल.

. सदर प्रस्तावाची छानणी अंती खालील बाबींची खात्री करणे आवश्यक असते.

. अर्जदार यांना जमीन मिळालेपासूनचे जुने /१२ फेरफार.

. मंडळ अधिकारी यांचा स्थळनिरीक्षण पंचनामा, तपासणीसुचीनुसार जबाब, जमीन घेणार देणार यांचे जातीचे दाखले / शाळेचे दाखले.

. उपवनसंरक्षक यांचा वन जमीन नसले बाबतीत निर्वनीकरण बाबत अभिप्राय.

. सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी किंवा दुय्यम यांचे चालू बाजार भावानुसार मूल्यांकन.

. भूसंपादन शाखेचा भसंपादन बाबत अभिप्राय

. पुनर्वसन शाखेचा लाभ / बुडीत क्षेत्रात येत नसलेबाबत अभिप्राय

. शर्तभंगाची रक्कम भारणेस टायर असलेबाबत अर्जदार यांचे प्रतिज्ञापत्र

. वरील बाबींची पूर्तता झाल्याची खात्री करून अर्जदार यांचे अर्जाचे अनुशंगाने जिल्हाधिकारी किंवा अपर जिल्हाधिकारी यांचेकडेस टिपणी सादर करणे. टिपणी मंजूर झालेनंतर विभागीय आयुक्त नाशिक यांना अहवाल सादर करणे.

. विभागीय आयुक्त, नाशिक यांचेकडील मंजुरीनंतर अर्जदार यांना पैसे भरणे बाबत कळविणे.

. अर्जदार यांना अनार्जित उत्पन्नाची रक्कम चनाने सरकार जमा केलेनंतर जमीन विक्री परवानगी देणे बाबतचे अंतिम आदेश पारित करणे.


आवश्यक कागदपत्रे :-

. अर्जदार यांचा अर्ज

. अर्जदार यांना जमीन मिळालेपासूनचे जुने /१२ उतारे त्यावरील फेरफार नोंदी

. मंडळ अधिकारी यांचा स्थलनिरीक्षण पंचनामा देणार घेणार यांचे तपासणी सूचीनुसार जबाब .

. उपवनसंरक्षक, भूसंपादन पुर्नवसन यांचे अभिप्राय

. सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी किंवा दुय्यम निबंधक यांचे चालू बाजार टक्यानुसार मूल्यांकन

. शर्तभंगाची रक्कम भरणेस तयार असलेबाबत अर्जदार यांचे प्रतिज्ञापत्र इतर आवश्यक कागदपत्रे

निर्णय घेणारे अधिकारी :-

नवीन शर्त जमिनीचा शर्तभंग नियमित करणे प्रकरणी जिल्हाधिकारी / अपर जिल्हाधिकारी / विभागीय आयुक्त हे अंतिम अधिकारी आहेत.

शासन निर्णय :-

. महाराष्ट्र जमीन महसूल पुस्तिका खंड परिपत्रक परिच्छेद ८१

. महाराष्ट्र जमीन महसूल वनविभागाकडे परिपत्रक क्र एलएनडी/१०८३/२७९२५/सीआर/३६७१/. दि. ०८.०९.१९८३                       


No comments

Web Analytics