G Ad

व्यक्ती / कंपनी / धर्मदाय / शैक्षणिक संस्था / सहकारी संस्था यांना जमीन खरेदीबाबत पूर्व अथवा कार्यानंतर परवानगी



जमीन खरेदीबाबत पूर्व अथवा कार्यानंतर परवानगी देणे प्रक्रियेचे स्वरूप :-

. जमिनीचा वापर खालीलपैकी खऱ्याखुऱ्या औद्योगिक / वाणिज्य / कंपनी / धर्मदाय / शैक्षणिक संस्था / सहकारी संस्था कारणासाठी करणार /होत असल्याबाबत खात्री आवश्यक आहे.

. जमीन खऱ्या बिगर शेती प्रयोजनासाठी वापरणे आवश्यक आहे

. औदयोगिक किंवा व्यापार विषयक उपक्रमा किंवा धर्मदाय / शैक्षणिक संस्थेच्या फायद्यसाठी जमिनीचा वापर आवश्यक आहे.

. आवश्यक कागदपत्रे :-

. अर्जदार संस्थेचा / व्यक्तीचा अर्ज

. जमिनीचा वापर खालीलपैकी खऱ्याखुऱ्या औद्योगिक / वाणिज्य / कंपनी / धर्मदाय / शैक्षणिक संस्था / सहकारी संस्था कारणासाठी करणार /होत असल्याबाबत प्रतिज्ञापत्र.

. जमिनीचे सन १९४० पासूनचे गट / सर्व्हे नंबरचे /१२ त्यावरील फेरफार प्रमाणित प्रत

. अर्जदार व्यक्ती / कंपनी / धर्मदाय / शैक्षणिक संस्था / सहकारी संस्था असल्यास नोंदणी प्रमाणपत्र

. सदरची संस्था हि नोंदणी अधिनियम १८६० अगर मुंबई विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० मधील तरतुदीप्रमाणे नोंदणी असलेबाबत प्रमाणपत्र

. अर्जदार कंपनी असल्यास कंपनी अधिनियम १९५६ मधील तरतुदीप्रमाणे पंजीकरण प्रमाणपत्र

. विश्वस्त संस्थेची घटना उदेश पत्रक प्रोज रिपोर्ट

. प्रो रिपोर्ट

. सहकारी संस्थेची घटना पोटनियमाची प्रत

१०. कंपनी असल्यास कंपनीचे मेमोरंडम ऑफ असोशिएशन प्रोजक रिपोर्ट प्रत

११. संबंधित संस्था / स्थानिक स्वराज्य संस्था / प्राधिकरण यांचा खालील प्रयोजनार्थ जमीन खरेदी करणेस परवानगी मिळणेबाबतचा अर्ज

१२. सदर विश्वस्त संस्था / कंपनी /सहकारी संस्था यांनी अशी परवानगी मिळणे कामी पारित केलेला ठराव.

१३. सदर विश्वस्त संस्था / कंपनी /सहकारी संस्था मुंबई जमीन धारणेची कमाल मर्यादा अधिनियम १९६१ १९७१ मधील तरतुदीप्रमाणे कमाल क्षेत्रापेक्षा जास्त जमीन धारण केलेली नसलेबाबत सदर जमिनीचा खराखरा अकृषिक वापर करणार असल्याबाबत प्रतिज्ञापत्र .


. निर्णय घेणारे अधिकारी :

जमीन खरेदीबाबत पूर्व अथवा कार्यानंतर परवानगी देणे कामी निर्णय अधिकारी अपर जिल्हा अधिकारी आहेत.

. शासन निर्णय :-

. मुंबई कुळवहिवाट शेतजमीन अधिनियम १९४६ चे कलम ६३

. मुंबई कुळ वहिवाट शेतजमीन नियम १९५६ चा नियम ३६



No comments

Web Analytics