G Ad

लोकशाही दिनातील तक्रारी



सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी अडचणी यांची न्याय तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून आयोजित केला जाणारालोकशाही दिन’ .

लोकशाही दिनाचे आयोजन करण्यासंबंधीचे आदेश शासनाने डिसेंबर २००८ला दिले आहेत. त्यानुसार प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी महापालिका मुख्यालयातील तिसऱ्या मजल्यावर असलेल्या स्थायी समिती सभागृहात अथवा आयुक्त कक्षाजवळील सभागृहात केले जाते.

पूर्वी हा कार्यक्रम नेहरुनगर रस्त्यावरील कामगार भवनात आयोजित केला जात होता. लोकशाही दिनाच्या पंधरा दिवस अगोदर संबंधित व्यक्तीने महापालिका मुख्यालयातील नागरी सुविधा केंद्रात प्रत्यक्ष येऊन दोन प्रतींत अर्ज सादर करणे आवश्यक असते. अर्ज प्राप्त झाल्यानंतर या अर्जाचा-मेलतक्रारीशी संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांना पाठविला जातो. यासह लोकशाही दिनाला हजर राहण्याची सूचना दिली जाते. अर्जदार नागरिकालाही कळविले जाते.

आयुक्तांसह विविध विभागाचे अधिकारी लोकशाही दिन उपक्रमाला उपस्थित असतात. विशेषत: संबधित नागरिकांची तक्रार ज्या विभागाशी संबंधित असेल, ते अधिकारी लोकशाही दिनास हजर असतात. तक्रारींवर चर्चा करून पुढील कार्यवाही केली जाते.

मात्र, महापालिकेतील लोकशाही दिनास अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. गेल्या एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांत केवळ तक्रार अर्ज प्राप्त झाले. या आठ महिन्यांतील सहा महिने तर अक्षरश: एकही अर्ज

आला नाही. त्यामुळे लोकशाही दिनाचे आयोजनही करण्यात आले नाही. दरम्यान, ठरवून दिलेल्या वेळेत एक जरी अर्ज प्राप्त झाला, तरी लोकशाही दिनाचे आयोजन करावे लागते.

मात्र, लोकशाही दिनासाठी १५ दिवस अगोदर अर्ज द्या, त्यानंतर प्रत्यक्ष हजर राहा, यापेक्षा महापालिकेच्यासारथी हेल्पलाईनवर काही नागरिक तक्रारी करू लागले. यासह आता दोन महिन्यांपासून क्षेत्रीय सभेचेही आयोजन होऊ लागले आहे. त्यामुळे अनेक नागरिक येथेही तक्रारी मांडतात.

. लोकशाही दिन खालीलप्रमाणे आयोजित करण्यात येतो :-

. क्र. लोकशाही दिन स्तर लोकशाही दिनाचा दिवस

. तालुका स्तर : - प्रत्येक महिन्याच्या तिस-या सोमवारी

. जिल्हाधिकारी/महानगरपालिका आयुक्त स्तर :- प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी

. विभागीय आयुक्त स्तर :- प्रत्येक महिन्याच्या दुस-या सोमवारी

. मंत्रालय स्तर :- प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी.

टीप :- वरीलप्रमाणे प्रत्येक स्तरावर लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो सदर दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतर येणा-या कामकाजाचा दिवस लोकशाही दिन म्हणून पाळण्यात येतो.

. लोकशाही दिन केंव्हा होणार नाही :-

. ज्या ज्या क्षेत्रामध्ये निवडणूकीकरिता आचारसहिंता लागू असल्यास लागू करण्यात आलेली असल्यास अशा ठिकाणी त्या स्तरावरील लोकशाही दिनाचे आयोजित करण्यात येऊ नये.असे शासनाचे आदेश आहेत.

. विधिमंडळ अधिवेशन काळात मंत्रालय स्तरावर लोकशाही दिन होणार नाही.

. ** लोकशाही दिनाचे अध्यक्ष :-

. तालुका लोकशाही दिन कार्यक्रमाचे अध्यक्ष :- तहसिलदार असतील

. जिल्हाधिकारी लोकशाही दिनामध्ये अध्यक्ष :- जिल्हाधिकारी

. महानगरपालिका लोकशाही दिनाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष :- संबधित महानगरपालिका आयुक्त

. विभागीय स्तरावरील लोकशाही दिनाचे अध्यक्ष :- विभागीय आयुक्त असतील

. मंत्रालय लोकशाही दिनाचे अध्यक्ष :- मा मख्यमंत्री असतील.

वरील चारही स्तरावरील लोकशाही दिन कार्यक्रमासंबधीत स्तरावरील मुख्यालय ठिकाणी १०.०० वाजता आयोजित करण्यात येते.

. * अर्ज स्विकृती निकष :-

. अर्जदार यांनी त्यांचा अर्ज विहित नमुन्यात करावा

. तक्रार /निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावी.

. चारही स्तरावरील लोकशाही दिनाकरिता अर्जदाराने अर्ज विहित नमुन्यात १५ दिवस आधी दोन प्रतीत पाठविणे आवश्यक आहे.

. तालुका लोकशाही दिनांनतर महिन्याने जिल्हाधिकारी /महानरपालिका आयुक्त लोकशाही दिनांत अर्ज करता येईल.

. जिल्हाधिकारी/महानगरपालिका आयुक्त लोकशाही दिनांनंतर दोन महिन्याने विभागीय लोकशाही दिनांत अर्ज करता येईल.

. विभागीय आयुक्त लोकशाही दिनांनंतर दोन महिन्यानी मंत्रालय लोकशाही दिनांत अर्ज करता येईल.

. * कोणत्या विषयावरील अर्ज स्विकारले जात नाहीत ?

. न्यायप्रविष्ठ प्रकरणे

. राजस्व/ अपिल्स

. सेवाविषयक,आस्थापना विषयक बाबी

. विहित नमुन्यात नसणारे त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रती जोडलेले अर्ज

. अंतिम उत्तर दिलेले आहे/देण्यात येणार आहे अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषया संदर्भात केलेले अर्ज

. तक्रार /निवेदन वैयक्तिक स्वरुपाची नसेल तर


वरीलप्रमाणे जे अर्ज लोकशाही दिनाकरिता स्विकृत करता येऊ शकणार नाहीत असे अर्ज संबधित विभागाकडे आवश्यक कार्यवाहीसाठी आठ दिवसांत पाठविण्यात यावे त्याची प्रत अर्जदारासह पुष्टाकिंत करावी.                        

No comments

Web Analytics