G Ad

महिला प्रधान क्षेत्रीय बचत एजन्सी नूतनीकरण

महिला प्रधान क्षेत्रीय बचत एजन्सी नूतनीकरण

केंद्रिय नियोजन आयोगाने शिफारस केल्यानुसार मुंबई राज्याने दिनांक 03/01/1957 रोजी अल्पबचत संचालनालयाची स्थापना केली. जनतेत काटकसर व बचतीची सवय वाढविणे तसेच वाचविलेली रक्कम योग्य प्रकाराने गुंतवण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करणे, व त्याआधारे अल्पबचत योजनेतील ठेवीमध्ये जास्तीत जास्त गुंतवणुक मिळवण्यासाठी राज्यशासनाकडुन अल्पबचत एजंटाची नेमणुक करण्यात येत होती. अल्पबचत योजनांची प्रसिध्दी विविध माध्यमातुन राज्य स्तरावरुन तर जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली उप/ सहायक संचालक अल्पबचत यांच्याकडुन केली जात होती.

यासाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे :-

१. विहित नमुन्यातील अर्ज.

२. विहित नमुन्यातील करारनामा.

३. एजन्सीचे अधिकार पत्र.

४. जिल्हाधिकारी यांच्याकडे प्लेज केलेल्या रु. १००/- चे एन . एस.सी. ची झेरॉक्स प्रत.

५. शिडापत्रिकेची झेरॉक्स प्रत.

६. चालू आर्थिक वर्षातील एजन्सी मार्फत केलेल्या गुंतवणुकीचा महिना निहाय अहवाल.                       





No comments

Web Analytics