G Ad

कुणबी ओ.बी.सी.जातीचे प्रमाणपत्र



आपण ज्या जातीचे आहोत ती प्रमाणित करणारा सरकारी दस्त ऐवज म्हणजे जातीचा दाखला.

कुणबी .बी. .सी (OBC) करिता आवश्यक कागदपत्रे :-

. विहित नमुन्यातील अर्ज कोर्ट फी स्टँप सह.प्रतिज्ञा पत्र नातेवाईकाचे प्रतिज्ञापत्र

. शालासोडल्याचा दाखला जर अर्जदार अशिक्षित असेल तर मुलाचे मुलीचे शाळेचा दाखला.प्राथमिक शाळेचा प्रवेश निर्गम उतारा.

. शासकीय संस्थेत असल्यास सेवा पुस्तिकेच्या पहिल्या पानाचा प्रमाणित उतारा.

. आजोबा,वडील,सख्या भाऊ-बहिण यांची जात नमूद असलेला दाखला म्हणजेच त्यांचा शालेय पुरावा.

. अर्जदार परराज्यातील स्थलांतरीत असल्यास तेथील जातीचे दाखल्याची प्रत.

. मंडळ अधिकारी यांचा गृह चौकशी अहवाल.

. लाईटबिल,घर कर पावती,भाडेपत्र,शिधापत्रिका उतारा.

. मागील तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला.

वरील प्रमाणे कागदपत्रे पुरावे नसतील तर सम्बन्धित व्यक्तीला खालील प्रमाणे कागदपत्राची पूर्तता करणे आवश्यक राहील.

. खापर पंजोबा आणि पंजोबा यांचे जुने कुणबी उल्लेख असलेले पुरावे.उदा.रेकॉर्डरूम तहसील कार्यालय येथे गाव नं.१४ चा उतारा ज्यात नाव कुणबी उल्लेख आढळतो.साधारणता ते सन १९६१ पूर्वीचे असावेत.

१०. जुने खरेदीखत त्याच बरोबर वंशावळ प्रतिज्ञापत्र

११. अर्जदाराने सादर केलेले दस्तऐवज मोडी लिपीतील असतील तर मोडींमधील दस्तऐवजांचे शासनमान्यता प्राप्त मोडी वाचकाकडून मराठीत रुपांतर करून तसे प्रतिज्ञापत्र स्टम्प पेपरवर करावे. मूळप्रत जोडावी.

१२. जातीचा दाखला प्राप्त करण्यासाठी वयाची अट नसते.जातीचा दाखल्याच्या वेळी जे प्रतिज्ञा द्यावे लागते.ते अर्जदार वय १८ पूर्ण नसल्यास त्याचे पालक सादर करून जातीचा दाखला प्राप्त करू शकतात.

यासाठी लागणार कालावधी :- १५ दिवस.                        

4 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete

  2. पण मी नागरी सुविधा केंद्रात कागदत्रे जमा केली असता मला 30 ते 90 दिवसांचा कालावधी प्रमाणपत्र मिळण्यासाठी लागेल असे सांगण्या त आले... यावर मार्गदर्शन करावे ही विनंती.

    ReplyDelete
  3. Sir kunbi certificate asel tar ib Post sathi apply karu shakto ka obc madhun

    ReplyDelete
  4. Documents for card sertificat

    ReplyDelete

Web Analytics