G Ad

अपंग कल्याण अधिनियम १९९५



अपंग कल्याण अधिनियम १९९५ समान संधी हक्काचे संरक्षण अंतर्गत तक्रारी :-

अपंग व्यक्तींना त्यांचे कायदेशीर हक्क अधिकारापासून वंचित ठेवले आहे अशी ज्यांची तक्रार असल्यास अशा अपंग व्यक्तींना आयुक्त.अपंग कल्याण यांच्याकडे लेखी तक्रार करता येईल,असे अपंग कल्याण आयुक्तालयाने कळविले आहे.

अपंग कल्याण अधिनियम १९९५ समान संधी हक्काचे संरक्षण अंतर्गत तक्रारी :-

अपंग व्यक्ती (समान संधी, हक्काचे संरक्षण आणि संपुर्ण सहभाग) अधिनियम १९९५ हा कायदा राज्यात दि. जानेवारीपासून अंमलात आलेला आहे. या कायद्यातील कलम ६२ अन्वये आयुक्त.अपंग कल्याण, महाराष्ट्र राज्य.पुणे स्वत:हून अगर कोणत्याही अपंग व्यथीत व्यक्तीच्या अर्जावरुन किंवा अन्यथा पुढील बाबी संबंधिच्या तक्रारी दाखल करता येतील. या कायद्यातील कलम ६० अन्वये कायद्याची अंमलबजावणी करण्याकरिता दि. १९
ऑगस्ट २००४ रोजीच्या शासन निर्णयाव्दारे महाराष्ट्र शासनाने स्वतंत्र अपंग कल्याण आयुक्तालय निर्णय केलेले आहे.

अपंग व्यक्तीचे हक्क डावलणे, अपंग व्यक्तीच्या कल्याणासाठी आणि हक्क संरक्षणासाठी समुचित शासन आणि स्थानिक प्राधिकरणे यांनी केलेले कायदे, नियम, उपविधी, विनियम किंवा दिलेले कार्यकारी आदेश, मार्गदर्शक तत्वे किंवा सुचना यांची अंमलबजावणी करणे, अपंग व्यक्तींना पात्र असून देखील केवळ अपंग म्हणून विविध सवलतीपासून वंचित ठेवणे अशा प्रकारच्या तक्रारी असतील तर त्या विहित नमुन्यात दाखल कराव्यात.

सदर तक्रार अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे खालील प्रमाणे :-

. विहित नमुन्यातील तक्रार अर्ज

. अर्जदार यांनी / जाबदार यांनी वकील नियुक्त केलेले असल्यास वकीलपत्र

. कागदपत्रांची यादी- पान क्रमांक अणुक्रमांकानुसार

* अपंगत्वाचे प्रमाणपत्र

* नियुक्ती / सेवा समाप्ती आदेश

* शासन नियम / शासन निर्णय

. स्थगिती /अंतरिम अर्ज असल्यास प्रत्येक जाब देणाऱ्याकरिता एक प्रत याप्रमाणे जोडलेली असावी.

. संपूर्ण कागदपत्रांचा सेट तक्रार अर्ज प्रत्येक जाबदेणार यांचे करिता एक प्रत प्रमाणे जोडावे.

. अर्जदार जाब देणारा या व्यक्ती निहाय / पक्षकार निहाय प्रोसेस फी-कोर्ट फी स्टॅम्पच्या स्वरूपात भरावी

. तक्रार अर्ज / अपील दाखल करण्यास कोण कोणते कारण घडले याबाबत अन्य न्यायालयात आदेश दिलेले आहेत काय? या बाबतचे आदेश जोडावेत.

. सदर न्यायाधिकरण कामकाज अपंग व्यक्ती अधिनियम १९९५ मधील तरतुदी नुसार अर्धन्यायिक स्वरूपाचे असल्याने दिवाणी प्रक्रिया संहिता १९०८ मधील तरतुदी नुसार प्रत्येक पक्षकाराने कार्यवाही करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.


अपंग कल्याण अधिनियम १९९५ समान संधी हक्कांचे संरक्षण संपूर्ण सहभाग मधील कलम ४२ नुसार मा. आयुक्त तथा सक्षम प्राधिकारी, अपंग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कडे करावयाच्या तक्रारीच्या / अपिलाचा अर्ज नमुना देण्यात आलेला आहे.                        

No comments

Web Analytics