G Ad

हॉटेल परवान्यासाठी कागदपत्रे



हॉटेल, लॉज सुरू करण्यासाठी तहसीलदारांकडून खाद्यगृह नोंदणी प्रमाणपत्र परवाना, प्रांताधिकाऱ्यांकडून लॉजिंग व्यवसायासाठी आदरातिथ्य परवाना घ्यावा लागतो. तो मुदतीत त्याचे नूतनीकरण करून घ्यावे लागते.

लागणारी आवश्यक कागदपत्रे :-

. विहित नमुन्यातील अर्ज रु. १०/- चे कोर्ट फी स्टॅम्प सह.

. सहाय्यक कामगार आयुक्त , यांच्याकडे केलेल्या नोंदणीचा दाखला.

. पीठ गिरणीपरवान्यासाठी अन्न औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांच्याकडील अन्नपरवाना.

. स्थळदर्शक नकाशा.

. /०३/२०१२ पूर्वीची नोंद असलेला मनपामालमत्ताउतारा / बांधकाम प्रारंभप्रमाणपत्र मंजूर बांधकामनकाशा.

. रु.१००/- च्या स्टॅंप पेपरवर नोटराईज्ड प्रतिज्ञापत्र (नमुन्याप्रमाणे).

. भाडेकरू / भोगवटादार असल्यास मालकाचे स्टँपपेपरवर संमतीपत्रक/ रजिस्टर भाडेकरारनामा / लिव्ह अँड लायसेन्स करारनामा.

. झोपडपट्टी असल्यास झोनिपु विभागाचा ना हरकत दाखला आवश्यक (फक्त पीठगिरणीस परवाना मिळेल.)

. रासायनिक ज्वलनशील पदार्थनिर्मिती अथवा त्यांचा वापर करणा-या उद्योगांसाठी अग्निशामक महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पुणे या विभागाचा ना हरकत दाखला अर्जासोबत जोडणे आवश्यक. सादर केलेल्या मूळ कागदपत्रांव्यतिरिक्त अन्य झेरॉक्स कागदपत्रे स्वाक्षांकित करणे आवश्यक

साठापरवाना घेण्याकरिता खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे -

. शॉप ऍ़क्ट लायसेन्स किंवा एस.एस.आय. प्रमाणपत्र (व्यवसाय प्रत्यक्ष सुरु असल्यास).

. ३१/०३/२०१२ पूर्वीची नोंद असलेला मनपा मालमत्ताउतारा / बांधकाम प्रारंभप्रमाणपत्र मंजूर बांधकामनकाशा.

. रु.१००/- च्या स्टॅंपपेपरवर नोटराईज्ड प्रतिज्ञापत्र (नमुन्याप्रमाणे).

. भाडेकरू/भोगवटादार असल्यास मालकाचे रजिस्टर संमतीपत्रक/ रजिस्टर भाडेकरारनामा / लिव्ह अँड लायसेन्सकरारनामा.

. स्थलदर्शक नकाशा.

. रासायनिक ज्वलनशील पदार्थांचा साठा करण्यासाठी अग्निशामक महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पुणे या विभागाचा ना हरकत दाखला.


सादर केलेल्या मूळ कागदपत्रांव्यतिरिक्त अन्य झेरॉक्स कागदपत्रे स्वाक्षांकित करणे आवश्यक.                        

No comments

Web Analytics