G Ad

वारसचे प्रमाणपत्र



शेतकरी कुटुंबातील परमुख व्यक्ती जिच्या नावावर शेत जमीन आहे. ती मयत झाली असता त्याचे मालकीच्या जमिनीवर वारसांची नोंद करावी लागते.वारस नोंदीमुळे त्या मालमत्तेत वारसांचा हक्क मिळण्यास मदत होते.

मयत खातेदारच्या वारसांची नोंद ज्यात घेतली जाते त्या नोंद वहीस गाव नमुना असे म्हणतात. वारस नोंदी प्रथम या यामध्येरजिस्टर मध्ये नोंदवून वारसाचीचौकशी केली जाते नंतर कोणाचे नाव वारस म्हणून जमिनीस लावायचे या बाबत वारस ठराव मंजूर केला जातो.
नंतर परत फेरफार नोंदवहीत नोंद केली जाते. वारासाबाबत जर तक्रार असेल तर शेतकर्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची आवश्यक संधी मिळू शकते.

वारस प्रमाणपत्र प्राप्तीसाठी लागणारी कागदपत्रे :-

. विहित नमुन्यातील कोट फी स्टँप लावलेला अर्ज शपथपत्र

. मृत्यू प्रमाणपत्र

. तलाठी अहवाल / मंडळ अहवाल.

. शासकीय नोकरीस असल्याचा पुरावा उदा.सेवा पुस्तिकेच्या पहिल्या पानाचा उतारा.

. मयत व्यक्ती पेन्शन असल्यास कोणत्या महिन्यापर्यंत शेवटचे पेन्शन उचललेल्या पानाची झेंरोकस.

. शिधापत्रिका/ रेशनिंग कार्ड /कुपणाची झेंरोकस प्रत.

. ग्रामपंचायत /नगरपालिका यांचा जन्म मृत्यूचा नोंद वहीतील उतारा.

. सेवा पुस्तिकेत विहित नमुन्यातील वारसाचे नाम लिहिलेला असल्याचा पुरावा.

यासाठी लागणारा कालावधी :- १८ दिवस                    

No comments

Web Analytics