G Ad

अधिकृत अल्पबचत एजन्सी परवाना कागदपत्रे



केंद्रिय नियोजन आयोगाने शिफारस केल्यानुसार मुंबई राज्याने दिनांक 03/01/1957 रोजी अल्पबचत संचालनालयाची स्थापना केली. जनतेत काटकसर बचतीची सवय वाढविणे तसेच वाचविलेली रक्कम योग्य प्रकाराने गुंतवण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करणे, त्याआधारे अल्पबचत योजनेतील ठेवीमध्ये जास्तीत जास्त गुंतवणुक मिळवण्यासाठी राज्यशासनाकडुन अल्पबचत एजंटाची नेमणुक करण्यात येत होती. अल्पबचत योजनांची प्रसिध्दी विविध माध्यमातुन राज्य स्तरावरुन तर जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली उप/ सहायक संचालक अल्पबचत यांच्याकडुन केली जात होती.

यासाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे :-

. विहित नमुन्यातील अर्ज.

. विहित नमुन्यातील करारनामा.

. ज्यांच्या नावावर एजन्सी ग्यावयाची आहे त्यांच्या नवे रु. २०००/- चे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र.

. स्वतःचे नवे असलेले एन. एस. सी. प्लेज करावयाचा विहित नमुन्यातील अर्ज.

. पासपोर्ट आकाराचे तीन फोटो.

. अर्जदारांची जमानत घेणारे जामीनदार यांचे सही असलेली करारनामा.

. राजपत्रित अधिकाऱ्यांनी दिलेली चारित्र्याचे प्रमाणपत्र.

. शाळा सोडल्याचा दाखला सत्यप्रत.

. अर्जदार स्वतः किंवा त्याचे जवळचे नातेवाईक राज्य किंवा केंद्र सरकारच्या कोणत्याही कार्यालयात नोकरीस नसल्याचे शपथपत्र.                       

No comments

Web Analytics