G Ad

संजय गांधी निराधार अनुदान योजना



राज्यातील निराधार, वृद्ध व्यक्ती. अंध, अपंग, शारीरिक, मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती, विधवा, अत्याचारित महिला, वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला, घटस्फोटीत महिलांना अर्थसहाय्य देण्याच्या मूळ हेतूने संजय गांधी निराधार अनुदान योजना १९८० पासून राबविण्यात येत आहे.

यासाठी लागणारी कागदपत्रे :

. पात्रतेचे निकष, अटी आणि शर्ती :

. निराधार, वृद्ध व्यक्ती, अंध, अपंग, शारीरिक, मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती, विधवा, अत्याचारित महिला, घटस्फोटीत महिला, अनाथ मुले, तृतीयपंथी, परित्यक्त्या

. किमान १५ वर्षांपासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक

. वय- ६५ वर्षांपेक्षा कमी

. कुटुंबाचे उत्पन्न प्रतिवर्षी रुपये २१,०००/- पर्यंत

. लाभाचे स्वरूप :

. लाभार्त्यांस दरमहा रुपये ६००/- देण्यात येतात

. एका कुटुंबात एका पेक्षा अधिक लाभार्थी असल्यास कुटुंबाला रुपये ९०० प्रतिमाह अनुदान देण्यात येते.

. आवश्यक कागदपत्रे

. वयाचा दाखला
. रहिवासी दाखला
. उत्पन्नाचा दाखला/ दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीमध्ये समावेश असल्याबद्दलचा साक्षांकित उतारा.

अपंगत्व/ रोगग्रस्त बाबत जिल्हा शल्यचिकित्सक (सिव्हील सर्जन)/ सरकारी हॉस्ल्च्य रुग्णालयांच्या वैद्यकीय अधीक्षक यांचा दाखला

. संपर्क

. अर्जदार राहत असलेल्या भागातील संबंधित तलाठी/ तहसीलदार.

यासाठी लागणारा कालावधी :- १० दिवस

No comments

Web Analytics